अल्कमृदा धातू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अल्कमृदा धातू[१] (अन्य मराठी नावे: अल्कधर्मी पार्थिव धातू, अल्कली पार्थिव धातू ; इंग्रजी: Alkaline earth metal" , अल्कलाइन अर्थ मेटल ;) हे आवर्त सारणीमधील द्विसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत दोन इलेक्ट्रॉन फिरत असल्यामुळे त्यांची संयुजा दोन असते. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्राँश्यम, बेरियम व रेडियम हे धातू अल्कमृदा धातुगटात गणले जातात.
| Z | मूलद्रव्य | इलेक्ट्रॉन रचना |
|---|---|---|
| ४ | बेरिलियम | २,२ |
| १२ | मॅग्नेशियम | २,८,२ |
| २० | कॅल्शियम | २,८,८,२ |
| ३८ | स्ट्राँश्यम | २,८,१८,८,२ |
| ५६ | बेरियम | २,८,१८,१८,८,२ |
| ८८ | रेडियम | २,८,१८,३२,१८,८,२ |
संदर्भ [संपादन]
- ↑ (जुलै, इ.स. १९९५) रसायनशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन. (मराठी मजकूर)
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- ग्रुप २: अल्कलाइन अर्थ मेटल्स ("गट २: अल्कमृदा धातू"). रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |