जॉन केरी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| जॉन केरी | |
|
|
|
| विद्यमान | |
| पदग्रहण जानेवारी २, १९८५ |
|
|
|
|
| जन्म | ११ डिसेंबर, इ.स. १९४३ ऑरोरा, कॉलोराडो |
|---|---|
| राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
| राजकीय पक्ष | डेमोक्रॅटिक पक्ष |
| धर्म | रोमन कॅथोलिक |
| सही | |
जॉन फोर्ब्ज केरी (११ डिसेंबर १९४३ - ) हा अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यामधील एक विद्यमान वरिष्ठ सेनेटर आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असणाऱ्या केरीला २००४ साली जॉर्ज डब्ल्यू. बुश विरुद्ध अध्यक्षीय निवडणुक लढण्यासाठी पक्षाकडून नामांकन मिळाले होते परंतु तो बुशकडून पराभूत झाला. सध्या केरी सेनेटमधील परराष्ट्र धोरण समितीचा चेअरमन आहे.
डिसेंबर २०१२ मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने आपल्या मंत्रीमंडळामध्ये परराष्ट्रसचिव (सेक्रेटरी ऑफ स्टेट) ह्या महत्त्वाच्या पदासाठी जॉन केरीची नेमणुक केली असल्याचा तीव्र अंदाज व्यक्त केला जात आहे. ह्या पदाची सुत्रे केरी मावळती परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन हिच्याकडून हाती घेईल.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |