इव्हान द टेरिबल
इव्हान द टेरिबल (रशियन Ива́н Четвёртый, Васи́льевич) (जन्म : २५ ऑगस्ट, १५३० मृत्यू : २८ मार्च, १५८४ [१]) हा रशियाचा पहिला झार होता. याने रशियन साम्राज्याचा विस्तार केला. याचा जन्म मॉस्कोजवळील मुस्कोव्ह येथे इ.स. १५३० मध्ये झाला.
कारकीर्द[संपादन]
वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या तिसर्या वर्षी युवराज बनल्यानंतर त्याच्या नावे त्याची आई आणि एक सल्लागार मंडळ कारभार पाहू लागले. वयाच्या सतराव्या वर्षी इव्हानने सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. इ.स. १५५२ मध्ये रशियाच्या विस्तारासाठी त्याने कझानचा पराभव केला. त्यानंतर चार वर्षांनी इ.स. १५५६ मध्ये अस्त्राखानचा पराभव केला. काही काळातच सायबेरियापर्यंत त्याने आपले साम्राज्य वाढवले. प्रस्थापित सरदारांच्या सल्लागारांचे वर्चस्व मोडून काढण्याच्या वेडात त्याने दहशतीचे राज्य निर्माण केले मात्र चोपन्न वर्षांच्या त्याच्या कारकीर्दीत रशियाचा झपाट्याने विस्तार झाला.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ↑ २८ मार्च : धिस डेट इन हिस्ट्री. २५ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)