कोरियन द्वीपकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोरियन द्वीपकल्पाचा नकाशा (कोरियन भाषा व रोमन लिपीतील मजकूर)

कोरियन द्वीपकल्प हा पूर्व आशियातील एक द्वीपकल्प आहे. आशिया खंडाच्या मुख्य भूमीपासून प्रशांत महासागरात १,१०० कि.मी. लांबीपर्यंत शिरलेला हा द्वीपकल्प पूर्वेस जपानाचा समुद्र, दक्षिणेस पूर्व चीन समुद्र, पश्चिमेस पिवळा समुद्र यांनी वेढला गेला आहे. उत्तर कोरियादक्षिण कोरिया हे दोन्ही देश या द्वीपकल्पावर वसले आहेत.