आयझॅक असिमोव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयझॅक असिमोव्ह

आयझॅक असिमोव्ह (देवनागरी लेखनभेद: इसाक असिमव; रशियन: Айзек Азимов, Исаак Юдович Озимов ; इंग्लिश: Isaac Asimov, Isaak Yudovich Ozimov ;) (जानेवारी २, इ.स. १९२० - एप्रिल ६, इ.स. १९९२) हा इंग्लिश भाषेत विज्ञान कथा लिहिणारे अमेरिकन लेखक व बॉस्टन विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.

[संपादन] चरित्र

असिमोव्हांचा जन्म ४ ऑक्टोबर इ.स. १९१९ आणि २ जानेवारी इ.स. १९२० दरम्यान रशियातील एका ज्यु कुटुंबात झाला. त्यांच्या जन्म तारखेबद्दल ग्रेगरियन आणि हिब्रु कँलेंडर यातील वादामुळे निश्चीत माहिती नाही. आयझॅक स्वतः त्यांचा जन्म २ जानेवारीचा मानून त्या दिवशी वाढदिवस साजरा करीत. आई-वडील नेहमी इंग्लिश आणि यिडीश भाषेत बोलत असल्याने आयझॅक यांना रशियन भाषा येत नव्हती.

आयझॅक ३ वर्षांचे असतांना असिमोव्ह कुटुंब अमेरिकेत स्थाईक झाले. वयाच्या ५ व्या वर्षी आयझॅकने शिकण्यास सुरूवात केली. तसेच त्यांनी इंग्लिश आणि यिडीश भाषांवर प्रभुत्व मिळविले. लहान वयातच आयझॅक यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण झाली. या विषयाचे पुस्तके मिळवून ते वडिलांच्या मनाविरूद्ध वाचीत असत. वयाचा ११ व्या वर्षी आयझॅकने लिखाण सुरू केले तर वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत त्यांचे लिखाण मासिकांमध्ये छापून येण्यास सुरूवात झाली. त्यांचे शालेय शिक्षण न्यु यॉर्क पब्लिक स्कुल मध्ये आणि इ.स. १९३९ साली पदवीचे शिक्षण कोलंबिया विद्यापीठातून झाले. असिमोव्ह हे जीवरसायनशास्त्र आणि भौतिकरसायन या दोन विषयात पीएच. डी. होते तर १४ विविध विद्यापीठांनी त्यांना सन्माननिय डॉक्टरेट बहाल केली. त्याशिवाय अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा वेळोवेळी पुरस्कार देऊन सत्कार केला. नुकतेच (इ.स. २००९ साली) असिमोव्ह यांच्या सन्मानार्थ मंगळ ग्रहावरील एका विवराला त्यांचे नाव देण्यात आले.

असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या असिमोव्ह यांनी खगोलशास्त्र, जीवशास्त्र, गणित, अमेरिकेचा इतिहास, पुराणकथा, भयकथा, गूढकथा, लघुकथा, निबंध अशा विविध विषयांवर ५१५ हून अधिक पुस्तके लिहिली.

एप्रिल ६ इ.स. १९९२ रोजी आयझॅक असिमोव्ह यांचे हृदयविकाराने आणि मूत्रपिंडातील दोषामुळे निधन झाले.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये