आनंदीबाई गोपाळराव जोशी
| आनंदीबाई गोपाळराव जोशी | |
आनंदीबाई गोपाळराव जोशी |
|
| जन्म | यमुना ३१ मार्च, इ.स. १८६५ पुणे , महाराष्ट्र |
|---|---|
| मृत्यू | २६ फेब्रुवारी १८८७ (वय वर्ष २१) |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| नागरिकत्व | भारतीय |
| शिक्षण | यम.डी (M.D) |
| प्रशिक्षणसंस्था | वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया |
| पेशा | वैद्यकीय |
| ख्याती | भारतातील पहिली महिला वैद्य (डॉक्टर) |
| धर्म | हिंदू |
| जोडीदार | गोपाळराव जोशी |
आनंदीबाई गोपाळराव जोशी (मार्च ३१, इ.स. १८६५- फेब्रुवारी २७, इ.स. १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
अनुक्रमणिका |
[संपादन] जीवन
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी ठाण्यात झाला.आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षे खूप थोरले असणार्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्नीचे जुने यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
गोपाळराव कल्याण ला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादी ची शतपत्रे वाचत . आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले होते . लोकहितवादीच्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्लिश भाषा शिकविण्याचा निश्चय केला. लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
[संपादन] वैद्यकीय शिक्षण
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. गोपाळरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्त धर्म न स्वीकारता १८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.
सुरुवातीला तत्कालीन समाजाकडून या कामाला खूप विरोध केला . आनंदीबाईंनी कलकत्त्यामध्ये एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही . मी माझा हिंदु धर्म व संस्कृति यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे .
आनंदीबाईचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम् डी झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना गोपालरावांचा वृक्षासारखा आधार होता म्हणूनच आनंदीबाईंची जीवन वेली बहरत गेली.
[संपादन] भारतात आगमन
एम् डी झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील एका स्थानिक हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
[संपादन] मृत्यू
आनंदीबाईना आपले पुढील ध्येय साध्य करायचेच होते. परंतु नियतीला हे पहायचे नसावे . त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे फेब्रु १८८७ मध्ये काळाने झड़प घातली आणि आनंदीबाईची जीवनज्योत मालवली.
केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी -गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.