मोर
| मोर | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
भारतीय नर मोर
|
||||||||||
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
|
||||||||||
| इतर नावे | ||||||||||
मोर (शास्त्रीय नाव: Pavo cristatus, उच्चार: पावो क्रिस्टेटस) हा एक पक्षी आहे. मोरांमध्ये नराला पिसारा असतो; मादीला, म्हणजेच लांडोरीला, पिसारा नसतो. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
अनुक्रमणिका |
आकार [संपादन]
मोर (नर) मोठ्या पक्ष्यांमधे गणला जातो. साधारणतः नर मोराची लांबी (चोचीपासून शेपूट सुरू होईपर्यंत) १०० ते ११५ सें.मी. असते. पूर्ण वाढलेला पिसारा १९५ ते २२५ सें.मी. असू शकतो. मोराचे वजन ४ - ६ किलो असते. लांडोर (मादी) आकाराने लहान असतात. त्यांची लांबी साधारणतः ९५ सें.मी. आणि वजन २.७ - ४ किलो असते. लांडोरीला पिसारा नसतो.
खाद्य [संपादन]
मोर धान्य, झाडाची पाने, किडे, साप, सरडे खातो.
वास्तव्य [संपादन]
मोर पानझडी जंगलांत राहतात. त् रात्री आसर्यासाठी झाडांवर जातात.
महाराष्ट्रात मोरांचे स्थान [संपादन]
महाराष्ट्रात खूप गावांलगत मोरांचा वावर आढळतो.मोर हे सरस्वती देवीचे वाहन आहे या श्रध्देपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व पाणी देत असतात. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या 'मोरांची चिंचोली'[१] नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात.
आवाज [संपादन]
मोराचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती)
सांस्कृतिक संदर्भ [संपादन]
मोर हे सरस्वती चे वाहन आहे.तसेच कार्तिकेयाचे देखील वाहन आहे.
क्षणचित्रे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
भारतीय मोर [संपादन]
-
भारतीय मोराचे एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका च्या पहिल्या आवृत्तीतील रेखाचित्र
-
चार्ल्स् ऑरबिगने यांच्या रेखाटनातून(१८०६–१८७६)
-
सिडनीतील सफेद मोर, ऑस्ट्रेलिया
-
श्रीलंका येथील मोराच्या घरट्यातील अंडी
हिरवा रंगाचा मोर [संपादन]
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- नाचणारा मोर बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.
|
|||||