अशोक सराफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.


अशोक सराफ
Ashok Saraf.jpg
जन्म जून ४, इ.स. १९४७
कार्यक्षेत्र मराठी नाटक
मराठी चित्रपट
बॉलीवुड
मराठी दूरचित्रवाणी मालिका
हिंदी दूरचित्रवाणी मालिका
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा मराठी, हिंदी
कारकिर्दीचा काळ इ.स. १९७१ - चालू
प्रमुख नाटके हमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपट नवरी मिळे नवर्‍याला
गंमत जंमत
अशी ही बनवाबनवी
आयत्या घरात घरोबा
वजीर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम हम पांच
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार
झी गौरव पुरस्कार

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत.. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे खरोखर मराठीतले सुपरस्टार होत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घरांघरांत पोचला आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] ओळख

मूळचे बेळगावचे असणार्‍या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.

गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या अशोक सराफ यांचा नाटक , सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी सारखाच संचार अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.[१]

[संपादन] अभिनय-प्रवास

'एक शेर दुसरी सव्वाशेर' चित्रपटातील एक दृश्यात अशोक सराफ

अशोक सराफ यांचा अभिनय 'अष्टपैलू' या विशेषणाशिवाय इतर शब्दात मांडणे कठीण आहे. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. विनोद रक्तातच मुरलेल्या अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसारख्या जगन्‍मान्य विनोदवीराशी तोडीस तोड अशी अभिनयाची जुगलबंदी पांडू हवालदार मध्ये दाखविली; तर कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी हुबेहूब साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांच्या हृदयात अजिंक्य स्थान मिळविले. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवर्‍याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, 'आई नंबर वन' व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.

'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत.[२] पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून 'टन टना टन' (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. अशा प्रकारची लोकप्रियता मिळवणारे अशोक हे बहुधा पहिले मराठी कलावंत ठरले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट.

मराठी हृदयात मानाचे स्थान मिळविलेल्या अशोक सराफ यांचा अभिनयाचा प्रवास अजूनही अविरत चालूच असून अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले आहे.

[संपादन] कारकीर्द[३]

नोंद: ही सूची सर्वसमावेशक नाही

[संपादन] चित्रपट

[संपादन] मराठी चित्रपट

अशी ही बनवाबनवी:अशोक सराफ यांचा लोकप्रिय चित्रपट

[संपादन] हिंदी चित्रपट

  • कुछ तुम कहो कुछ हम कहें
  • बेटी नं. वन
  • कोयला
  • गुप्त
  • ऐसी भी क्या जल्दी है
  • संगदिल सनम
  • जोरू का गुलाम
  • खूबसूरत
  • येस बॉस
  • करण अर्जुन
  • बाबा धूमधडाका (अप्रदर्शित)

[संपादन] रंगमंच

  • हमीदाबाईची कोठी
  • अनधिकृत
  • मनोमिलन
  • हे राम कार्डिओग्राम
  • डार्लिंग डार्लिंग
  • सारखं छातीत दुखतंय

[संपादन] दूरचित्रवाणी

  • टन टना टन (ई.टीव्ही मराठी)
  • हम पांच (झी वाहिनी)
  • डोन्ट वरी, हो जाएगा (हिंदी)
  • छोटी बडी बातें

[संपादन] संदर्भ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये