सचिन पिळगांवकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सचिन
जन्म सचिन पिळगांवकर
ऑगस्ट १७, इ.स. १९५७
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे महागुरु
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, दूरचित्रवाणी, नाटके)
भाषा स्वभाषा: मराठी,
अभिनय: मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट हा माझा मार्ग एकला
नवरी मिळे नवर्‍याला
अशी ही बनवाबनवी
अदला बदली
पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
पत्नी सुप्रिया पिळगांवकर

सचिन पिळगांवकर (ऑगस्ट १७, इ.स. १९५७; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी चित्रपट अभिनेता, निर्माता आहे. याने मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नाटकांतून अभिनय केला आहे. इ.स. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचे चित्रपटक्षेत्रात पदार्पण झाले.

मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर याची पत्नी आहे.

बालपण[संपादन]

सचिन पिळगांवकर याचा जन्म मुंबईत एका मराठी-कोकणी परिवारात झाला. इ.स. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.

कारकीर्द[संपादन]

त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या.

त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. त्यानंतर तो मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळला. सचिनने सुप्रियाच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.

कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

चित्रपट प्रदर्शनाचे वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
नवरा माझा नवसाचा मराठी अभिनय
नवरी मिळे नवऱ्याला मराठी अभिनय
हा माझा मार्ग एकला मराठी अभिनय
अशी ही बनवा बनवी मराठी अभिनय
अदला बदली मराठी अभिनय
माझा पती करोड पती मराठी अभिनय
आयत्या घरात घरोबा मराठी अभिनय

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.