Jump to content

व्यसनमुक्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दारूपासून व्यसनमुक्ती

[संपादन]

दारू हे एक व्यसन आहे. वारंवार दारू पिण्याची इच्छा हा मानसिक आजार आहे.   दारूमुळे अनेकांची घरे उध्वस्त होतात. घरातील मुलांवर व्यवस्थित संस्कार होत नाहीत. स्रियांवर अत्याचार होतात. त्यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित रहाते. व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर खालील प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात.

१.मानसिक : सतत चिडचिड होणे, आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटणे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या विकारांचे प्रमाण वाढणे. एकलकोंडेपणा, अनामिक भीती, वैफल्यग्रस्तता, संशय, आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटणे, दैनंदिन व्यवहारांत नकारात्मकता, आपण अपयशी असल्याचा गंड, आपण कुणीतरी विशेष आहोत असे समजणे, स्वतःच्या अति प्रेमात असणे व जगाला तुच्छ समजणे ही व यासारखी अनेक कारणे त्या व्यक्तीला दारूशी बांधून ठेवतात.

२.शारीरिक : सर्व इंद्रियांची क्षमता कमी होणे, रक्तवाहिन्या कमकुवत होणे, स्नायू, सांध्यांची कार्यक्षमता कमी होत जाणे, लैंगिक क्षमता नष्ट होणे किवा नपुंसकता निर्माण होणे, शुक्राणूंचा नाश, मज्जासंस्थेशी संबधित कार्यात बिघाड, पचनशक्ती क्षीण होणे, यकृत आणि किडनी खराब होणे, मधुमेह, रक्तदाब इत्यादी विकार होणे.

३.आर्थिक : व्यसनावर जास्तीतजास्त पैसे उडवणे, नोकरी/व्यवसाय यांकडे दुर्लक्ष, कार्यक्षमता कमी झाल्याने आळशीपणा वाढणे, घरातील आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष, उधाऱ्या करणे किवा कर्जे काढणे, नोकरी/व्यवसाय बंद पडणे, वगैरे.

४.लैंगिक : दारू पिणाऱ्या माणसाला संभोगाची इच्छा होते परंतु लिंगास आधीसारखी ताठरता येत नाही दारू पिल्याने लैंगिक इच्छा वाढली तरी लैंगिक सुख कमी होते.

व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. जसे की, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, येरवडा, पुणे इत्यादी. याच सोबत विविध समाजसेवकांनी आणि लोककलाकारांनी सुद्धा व्यसनमुक्ती अभियान चालवले आहेत, ज्यात बशीर मोमीन (कवठेकर) यांचे देखील योगदान आहे, ज्या कारणास्तव त्यांना राज्य शासनाने २००३ साली ‘व्यसनमुक्ति पुरस्कार' देऊन सन्मानित केले.[]

पुस्तके

[संपादन]

व्यसनमुक्ती या विषयावर विविध लेखकांची पुस्तके सुद्धा आहेत.

  • बिनपैशाने व्यसनमुक्ती (लेखक - एस.एस. सूर्यवंशी; मुक्तांगण प्रकाशन)
  • मुक्तांगणचे दिवस (लेखक डॉ. अनिल अवचट)
  • मुक्तीपत्रे (लेखक डॉ. आनंद नाडकर्णी)
  • मनोगती (लेखक डॉ. आनंद नाडकर्णी)
  • बारा पायऱ्या आणि बारा रूढी (अल्कोहोलिक ॲनॉनिमस)
  • सोबर जगणे (लेखक ए ए सदस्य)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "बशीर मोमीन (कवठेकर)]". महाराष्ट्र टाइम्स. 2019-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ जानेवारी २०२४ रोजी पाहिले.