अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस
self-help organization | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
प्रकार | विना-नफा संस्था, support group, self-help group for mental health |
---|---|
याचे नावाने नामकरण |
|
संस्थापक |
|
स्थापना |
|
अधिकृत संकेतस्थळ | |
अलकोहोलिक्स अनॉनिमस ही, स्वतः मद्यापासून दूर राहात इतरांना मद्यासक्तीतुन बाहेर पडण्यास इच्छा असेल तर स्वानुभवातून मदत करण्याच्या हेतूला वाहून घेतलेली मद्यासक्त लोकांची आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारी फेलोशिप आहे. सुधारणेसाठी १२ पायऱ्या (आध्यात्मिक तत्वे ) आचरणात आणणे हा त्यांचा सुधारणेचा कार्यक्रम आहे. अलकोहोलिक्स अनॉनिमस अव्यावसायिक, कोणत्याही धर्म व पंथ वा राजकीय पक्ष यांच्याशी न जोडलेली (संलग्न नसलेली) फेलोशिप आहे व अमेरिका व कॅनडा इथे त्यांचे १५ लक्ष सभासद आहेत व ५ लक्ष इतर १८१ देशात आहेत. ही भारतात पण १९५७ पासून अस्तित्वात आहे. तसेच महारष्ट्रातातील बहुतेक जिल्ह्यात तिच्या सभा चालतात.
मद्यासक्तीबद्दल, तो एक आजार आहे अशा प्रकारचे स्पष्टीकरण करणाऱ्या मांडणीबद्दल ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) ने अलिप्तता ठेवली आहे पण बऱ्याच ए ए सभासदांनी वैयक्तिक पातळीवर स्वतंत्रपणे प्रचार केल्यामुळे या मांडणीला अधिक स्वीकारले गेले आहे. ही फेलोशिप किती परिणामकारक आहे या बद्दल नुकताच केलेला वैज्ञानिक आढावा असे सांगतो : अशा मद्यासक्त लोकांना ए.ए. मध्ये मदत घेणे हे इतर प्रकारे मदत घेण्यापेक्षा अधिक परिणामकारक ठरते.
१९३५ साली ए.ए. ची सुरुवात झाली, जेंव्हा नुकताच मद्यमुक्त(सोबर) झालेल्या बिल विल्सनची (बिल डब्ल्यू.), त्याची मद्यमुक्ती टिकावी यासाठी अजून मद्यासक्त मिळावा या धडपडीतून, बॉब स्मिथ(डॉ बॉब) यांच्याशी भेट झाली. बिल १९३४ पासून व डॉ बॉब १९३२ पासून ऑक्सफर्ड समूहाच्या (ख्रिस्ती पुनरुज्जीवनवादी चळवळ) बैठकीत जाऊन तेथील आध्यात्मिक तत्वांची कास धरून स्वतःच्या स्वभावात बदल करण्याचे प्रयत्न करत होतेच. या दोघांनी व त्यांनी दारू पासून दूर राहण्यास मदत केली अशा इतर लोकांनी, ऑक्सफर्ड समुहापासून अलग होत, जवळपास १०० मद्यमुक्त दारुड्यांची मद्यमुक्तीची कहाणी, एका ग्रंथात छापली व त्या पुस्तकाचे "अलकोहोलिक्स अनॉनिमस" असे ठेवले. हा ग्रंथ १९३९ साली प्रसिद्ध झाला व तेच नाव या फेलोशिपला मिळाले. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत ए.ए. चा सुधारणेचा कार्यक्रम दिलेला आहे, ज्याला सुधारणेच्या १२ पायऱ्या असे म्हणले जाते. नंतरच्या आवृत्त्यात फेलोशिपचा, सुरुवातीचा दयाळू बेबंदशाही काळ जाऊन एकता टिकावी या हेतूने अनुभवाने तयार झालेली १२ तत्वे (ज्याला १२ परंपरा म्हणले जाते), पण दिलेली आहेत. ह्या १२ परंपरा १९४६ साली छापल्या गेल्या.
ए.ए,चा बारा पायऱ्यांचा सुधारणेचा कार्यक्रम : मद्यशक्तीपुढे पराभव मान्य करून आपल्याहून श्रेष्ठ शक्तीच्या मदतीने आत्मसंशोधन करणे, स्वतःचे दोष मान्य करून त्याची कबुली देणे, व्यक्तिमत्वातील हे दोष दूर होण्यास उच्च शक्तीची मदत घेणे, भूतकाळातील चुकांचे परिमार्जन हा त्या सुधारणा कार्यक्रमाचा एक भाग आहे. त्यानंतर आपल्यातली सुधारणा टिकवून धरण्यास, वाढवण्यास व इतर मद्यपीडित लोकांना हा सुधारणेचा संदेश विनामूल्य व विनाअट देणे हा या बारा पायऱ्यांच्या कार्यक्रमाचा उर्वरित हिस्सा आहे. परंतु ए.ए.मध्ये कोणतीच गोष्ट बंधनकारक नाही व या बाऱ्या पायऱ्या पण घेतल्याच पाहिजेत असे सांगितले जात नाही व कोणी त्यावर लक्ष ठेवत नाही. "देव" हा शब्द या १२ पायऱ्यांत आहे पण त्याचा अर्थ स्वतःहून उच्च शक्ती किंवा "मला (आम्हाला) उमजलेला देव" लावून त्या अर्थाने बघायची पूर्ण मोकळीक ए.ए.मध्ये आहे.
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस च्या १२ परंपरा(रूढी) : ह्या ए.ए. सभासद, समूह आणि इतर ए.ए. सेवासमित्या आणि ए.ए.केंद्रे यांना मार्गदर्शक तत्वे म्ह्णून सुचवली गेलेली आहेत. सभासदत्वासाठी दारू सोडण्याची इच्च्छा, ही एकमेव आवश्यकता आहे असे सांगत या रूढी कट्टरता, अधिकारपदांची उतरंड आणि सार्वजनिक वादविवाद याबद्दल जागरूक करतात. तसेच ए. ए.चा एकमेव हेतू दारू पासून दूर राहण्यास मदत करणे आहे हे पण सांगतात. बदला घेतला जाईल किंवा आज्ञापालन सक्ती केली जाईल असा भाव न आणता या रूढी सार्वजनिक पातळीवर निनांवीपणा राखण्याची निकड दर्शवतात. ए.ए च्या नावाखाली संपत्ती, मालमत्ता व मोठेपणा मिळवण्यापासून दूर राहण्यास या रूढी सभासद व समूह यांना सावध करतात. प्रत्येक ए.ए समूह हा स्वायत्त असतो व परंतु त्याने सभासदांनी दिलेल्या ऐच्छिक अंशदानातूनच स्वतःचा खर्च भागवायचा असतो व बाह्य जगातून मदत मिळाली तर ती नाकारायची असते. इतर कोणत्याही उपक्रमाशी ए.ए. संलग्न होत नाही व कोणाचाही पुरस्कार करत नाही.
एएची परवानगी घेऊन, नार्कोटिक्स ॲनॉनिमस व गॅम्बलिंग ॲनॉनिमस या व अशा अनेक फेलोशिप्सनी, त्यांच्या विविध आसक्तीतुन मुक्तता व्हावी यासाठी आचरणात आणण्याच्या कार्यक्रमासाठी एए च्या १२ पायऱ्या व १२ परंपरा योग्य तो बदल करून स्वीकारल्या आहेत.
एक्रोन(ओहिओ प्रांत, अमेरिका) या शहरात बिल विल्सन हे ६ महिने मद्यमुक्त असलेले सभासद व डॉ बॉब यांची मी १९३५ साली भेट झाली. बिल यांनी आपल्याला दारूपुढे का हार न]मानावी लागली व कोणत्या आध्यत्मिक तत्वांच्या आधारे ते ६ महिने मद्यमुक्त आहेत यांचे तपशीलवार अनुभव डॉ बॉब यांच्याजवळ शेअर केले. यानंतर सुमारे १ महिन्यानी म्हणजे १० जून १९३५ साली डॉ बॉब यांनी शेवटचे मद्यपान केले. तो दिवस ए.ए. चा स्थापना दिवस मानला जातो.
अल्कोहोलिक ॲनॉनिमसची काही घोषवाक्ये - वन डे ऍट अ टाइम (फक्त आजचा दिवस). धिस टू शॅल पास(हेही दिवस जातील). HALT(Hungar, Anger, Loneliness, Tiredness)
’फक्त आजचा दिवस’ या विधानाने अनेक व्यसनी लोकांची आयुष्ये बदलून गेली. काल होऊन गेलेला, भूतकाळ आपण बदलू शकत नाही, भविष्यकाळ आपल्या हातात नाही.आपल्या हातात आहे, फक्त आज. फक्त आजचा दिवस. त्यातही आत्ताचा क्षण. भूतकाळ आठवला तर केलेल्या कृत्यांचा पश्चात्तापहोतो. गमावलेल्या संधी, गमावलेले आयुष्य़ आठवले की मनस्ताप होतो.आणि याचे पर्यवसान परत व्यसनाकडे वळणे हेच. त्यामुळे भूतकाळाचे ओझे उतरवले की दारुड्याच्या डोक्यावरचे निम्मे ओझे उतरते. आता दारू सोडली तर दारूशिवाय आयुष्य कसे कंठायचे याचे भय मनाचा ताबा घेते. शिवाय व्यसनाच्या काळात केलेल्या कर्जाची चिंता. बायको सोडून गेली असेल तर परत येईल का ही काळजी. अशा अनेक काळज्या जिवाला पोखरत असतात. परत याचा शेवट म्हणजे पिण्याकडे वळणे. तेव्हा भविष्यकाळाची काळजी करायची नाही असे ठरवायचे. कारण भविष्यकाळ आपल्या हातात नाही. म्हणजे आहे तो फक्त आजचा दिवस. आज सकाळी उठल्यावर ठरवायचे की आज मी दारू पिणार नाही.रात्री झोपताना म्हणायचे की चल, एक दिवस पदरात पडला. हवे तर त्यासाठी देवाचे आभार माना. आपल्याला मदत करणाऱ्या सर्वांचे वाटल्यास आभार माना. असे जे करतात त्याची वर्षे कशी पुरी होतात ते त्यांनाच कळत नाही.
धिस टू शॅल पास : हे घोषवाक्य म्हणजे - तू कितीही दुःखात असशील तरी हेही दिवस जातील. फिर सुबह होगी. रातका महेमॉं है अन्धेरा, किसके रोके रुका है सवेरा.
HALT : एच म्हणजे हंगर-भूक, ए म्हणजे ॲंगर-राग, एल म्हणजे लोन्लीनेस-एकटेपणा आणि टी म्हणजे टायर्डनेस-थकवा. या चारही गोष्टी परत व्यसनाकडे नेऊ शकतात. त्यामुळे या कटाक्षाने टाळायच्या असतात. आवरी रागाला, कधी राही न भुका, दमू नको जास्त, कधी राही न अकेला. भूक, राग, एकटेपणा आणि थकवा हे चारही दारूकडे नेणारे धोक्याचे सिग्नल आहेत.
- अल्कोहोलिक ॲनॉनिमसने केलेल्या आणखी काही सूचना
- खिशात जास्त पैसे ठेऊ नका.
- बाल्कनीत उभे राहिले आणि ढग दाटून पावसाची लक्षणे दिसायला लागली की, पूर्वी अशाच हवेत प्यालेल्या दारूची आठवण येईल. तेव्हा असे काही विचार मनात यायच्या आत बाल्कनीतून घरात या.
पूर्वी जात होतां त्या दारूच्या गुत्त्यावरून किंवा रेस्टॉरंटवरून त्या विशिष्ट वेळी जाऊसुद्धा नका. केव्हा परत दारूचे व्यसन सुरू होईल, सांगता येणार नाही.
- आपल्या दारुड्या मित्रांना फोन करू नका, त्यांचे फोन घेऊ नका आणि त्यांना भेटूही नका. त्यांची दारू प्यायची जी वेळ असेल तेव्हा आपल्या दारू सोडलेल्या मित्रांबरोबर संस्थेतच थांबा. वगैरे वगैरे.
अल्कोहोलिक ॲनॉनिमससारख्या आणखीही काही संस्था आहेत -
- नॉरकॉटिक ॲनॉनिमस
- ओबेसिटी ॲनॉनिमस
- गॅंबलिंग ॲनॉनिमस
भारतात व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अल्कोहिलिक ॲनॉनिमससारख्या अनेक संस्था आहेत. डॉ अनिल अवचट, डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांनी स्थापन केलेली मुक्तांगण संस्था ही त्यापैकी एक आहे. मुक्तांगण ही संस्था सुरुवातीची अनेक वर्षे पु.ल. देशपांडे यांच्या पैशाने चालत असे.
शाखा
[संपादन]सातारा जिल्हा
[संपादन]सातारा जिल्ह्याच्या एकूण ११ तालुक्यांपैकी सातारा, कराड, वाई, फलटण, कोरेगाव, खटाव, अश्या ६ तालुक्यात ए.ए.च्या शाखा आहेत. जिल्ह्यातील एकूण समूहांची संख्या ९ असून आठवड्यात ए.ए. च्या एकूण २० बैठकी होतात. जिल्ह्यातील एकूण सभासदांची संख्या १०० ते १२० च्या आसपास आहे. सातारा जिल्ह्यात आंतर समुह किंवा जिल्हा कमिटी नाही.
नांदेड जिल्हा
[संपादन]नांदेड जिल्ह्याच्या एकूण १६ तालुक्यांपैकी नांदेड, बिलोली, लोहा, नायगाव आणि मुदखेड अश्या ५ तालुक्यात ए.ए.च्या शाखा आहेत. एकूण समूह ७ व एकूण साप्ताहिक सभा १६.
चंद्रपूर जिल्हा
[संपादन]अख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुका पातळीवर पोहोचलेली ए.ए. म्हणजे चंद्रपूर ए.ए. फेलोशिप होय असे म्हणावे लागेल. १५ पैकी केवळ "जिवती" तालुक्यात अजून ए ए समूह नाहीत. या जिवती तालुक्यात पण येत्या काही महिन्यात ए ए समूह/सभा सुरू होईल.