"माधवराव शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो moving to category वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते using AWB
छो moving to भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी using AWB
ओळ ४: ओळ ४:


[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय रेल्वेमंत्री]]
[[वर्ग:भारतीय रेल्वेमंत्री]]
[[वर्ग:भारतीय नागरी विमानवाहतूक मंत्री]]
[[वर्ग:भारतीय नागरी विमानवाहतूक मंत्री]]

१२:४८, ११ जून २०११ ची आवृत्ती


माधवराव शिंदे (मार्च १०, १९४५ - सप्टेंबर ३०, २००१ ) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. ते १९७१, १९७७, १९८० आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील गुणा लोकसभा मतदारसंघातून तर १९८४, १९८९, १९९१, १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला. त्यानंतर ते राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होते. त्या काळात त्यांनी भारतीय रेल्वेच्या संगणकीकरणावर भर दिला. त्यानंतर ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात नागरी विमानवाहतूक मंत्री आणि मनुष्यबळविकासमंत्री होते. १९९६ साली त्यांचे नाव जैन हवाला डायरी प्रकरणात गोवले गेल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेसबाहेर पडून स्वत:चा मध्य प्रदेश विकास कॉंग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये परतले आणि त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते कॉंग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे उपाध्यक्ष बनले. सप्टेंबर ३०, २००१ रोजी ते लखनौ येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करायला दिल्लीहून विमानाने जात असताना त्यांचे विमान उत्तर प्रदेश राज्यात मैनपुरी जिल्ह्यात कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.