"सदस्य चर्चा:संतोष दहिवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ७०: ओळ ७०:


[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १९:३७, ११ मे २०११ (UTC)
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १९:३७, ११ मे २०११ (UTC)

== आग मराठी फॉन्ट ==
आग मराठी फॉन्ट हा खास फॉन्ट मी स्वतः माझ्या आग ऑपरेटिंग सिस्टिम साठी तयार केला आहे. हा फॉन्ट वापरण्यासाठी तुम्हाला आग ऑपरेटिंग सिस्टिम वापरावी लागेल.

१८:५०, १३ मे २०११ ची आवृत्ती

संदर्भ

नमस्कार,

तुमच्या प्रश्नानंतर विकिपीडियावर शोध घेतला असता संदर्भ कसे द्यावे याबद्दल पटकन काही सापडले नाही म्हणून तीन सहाय्यपाने सुरू करीत आहे. हा पाने आहेत --

सुरुवातीस इंग्लिश विकिपीडियावरील माहिती असली तरी हळूहळू त्यात मराठी विकिपीडियावरील स्थानिक धोरणे त्यात घातली जातील.

सदस्य:माहितगार यांनी याबद्दल काही तयार केले असल्याची दाट शक्यता आहे तरी त्यांनाही एक संदेश द्यावा.

अभय नातू १७:३७, २० एप्रिल २०११ (UTC)

जोर्वेतील संदर्भ

संदर्भ देण्याची पद्धत बरोबर आहे.

काही सूचना --

  • पुस्तकाचा संदर्भ देताना शक्य झाल्यास आयएसबीएन द्यावा.
  • लेखांमध्ये आपली सही (~~~~) करू नये. चर्चा पानांवर, चावडीवर जरुर करावी.

अभय नातू १७:५९, २० एप्रिल २०११ (UTC)

सहाय्याबद्दल

धन्यवादसंतोष दहिवळ १८:०५, २० एप्रिल २०११ (UTC).

पुनर्निर्देशन

तुम्ही केलेले बदल पाहिले. एखाद्या लेखाचे दुसरीकडे पुनर्निर्देशन करताना पहिल्या लेखात फक्त '''#पुनर्निर्देशन[[लेखाचे नाव]]''' इतकाच मजकूर पाहिजे. तुम्ही पहिल्या लेखात पुनर्निर्देशन घातले परंतु उरलेला मजकूर काढला नाहीत म्हणून तुम्हाला अपेक्षित बदल झाला नाही.

अभय नातू ०२:०१, २२ एप्रिल २०११ (UTC)

धर्मापुरी आणि केदारेश्वर

नमस्कार!

मला वाटते धर्मापुरीतील केदारेश्वर मंदिर अश्या संदर्भात सध्याचा लेख ठीक ठरेल. मात्र त्यासाठी त्याचे "केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी" किंवा "केदारेश्वर मंदिर, जे-कोणते-गाव-असेल-त्या-गावाचे/जिल्ह्याचे-नाव" असे स्थानांतरण करता येईल (हे तुम्हीदेखील 'स्थानांतरण' टॅब वापरून करू शकाल). एकदा हा लेख योग्य शीर्षकाखाली आला, की मग धर्मापुरी लेखात या मंदिराबद्दल संक्षेपाने (दोनेक वाक्यांत) उल्लेख करून विकिदुवा टाकता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३०, २२ एप्रिल २०११ (UTC)


इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस?

लंडनमध्ये ऑक्सफ़र्ड युनि.प्रेस, केंब्रिज युनि.प्रेस सारख्या संस्था आहेत. पण ज्या छापखान्यात रामदास भटकळांनी काम केले ती English University's (किंवा Universities) Press लंडनमध्ये नेमकी कुठे आहे? लंडन गाइडमध्ये सापडली नाही. ...J १८:०८, ९ मे २०११ (UTC)

इंग्लिश युनिव्हर्सिटीज

Engish Universities चा पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद....J १८:५७, ९ मे २०११ (UTC)

अर्धा ऱ

ऱ्य | ऱ्ह | ॲ | ऑ

या व इतर सर्व शब्दांची माहिती मी युनिकोड या पानावर लिहिलेली आहे. . . Ashish Gaikwad १५:१२, १० मे २०११ (UTC)

स्थानांतरण

नमस्कार,

जर एखादे पान चुकीच्या (शुद्धलेखन, व्याकरण, इतर दृष्ट्या) शीर्षकाखाली तयार केले गेले तर त्याचे बिनचूक शीर्षकाखाली स्थानांतरण केले जाते. बरेचदा जुन्या पानावरुन नवीन पानाकडे पुनर्निर्देशनही ठेवले जाते. असे केल्याने जर एखाद्याने जुन्या नावाने शोध घेतला तर त्याला आपोआप नवीन पानाकडे नेले जाते. क्वचित जुने पान (शीर्षकात अनेक चुका, इंग्लिशमध्ये असलेले) गाळलेही जाते.

अर्थात, स्थानांतरण झालेले प्रत्येक पान साफ चूक असते असेही नाही, पण अधिक समर्पक अशा शीर्षकाखाली त्याचे स्थानांतरण केले जाते. तसेच विकिपीडियावरील काही संकेतांचे पालन करण्यासाठीही असे केले जाते. उदा. येथे व्यक्तिलेखांची शीर्षके लिहिताना आद्याक्षरांत जागा सोडली जात नाही पण आद्याक्षरे व आडनावात जागा असते. म्हणजे ह.अ.भावे हे चूक नाही पण ह.अ. भावे हे अधिक बरोबर.

अभय नातू १८:१९, ११ मे २०११ (UTC)

पुराचुंबकिय कालमापन पद्धती

मी पुराचुंबकिय कालमापन पध्दती पानाचे पुराचुंबकिय कालमापन पद्धती असे स्थानांतरण आधीच केले होते.

स्थानांतरण करण्यासाठी पानाच्या वरच्या बाजूस संपादन, इतिहास जवळ स्थानांतरण असा एक टॅब असतो, त्यावरुन स्थानांतरण करता येते.

अभय नातू १९:३७, ११ मे २०११ (UTC)

आग मराठी फॉन्ट

आग मराठी फॉन्ट हा खास फॉन्ट मी स्वतः माझ्या आग ऑपरेटिंग सिस्टिम साठी तयार केला आहे. हा फॉन्ट वापरण्यासाठी तुम्हाला आग ऑपरेटिंग सिस्टिम वापरावी लागेल.