"वरणफळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २८: ओळ २८:


[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख]]

१५:०१, २० जानेवारी २०२१ ची आवृत्ती

वरणफळे

साहित्य

  1. कणिक
  2. हळद
  3. तिखट
  4. मिठ
  5. शेंगदाणा तेल
  6. तुरीची डाळ
  7. मोहरी
  8. चिंच
  9. गुळ/साखर(चवीसाठी)
  10. ओवा

पुर्व तयारी

प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या.कणकीत हळद,तिखट,मीठ,ओवा(थोडा)टाकुन घट्ट भिजवुन घ्या.त्याचे गोळे घेउन पणतीच्या आकाराच्या वाट्या (फळे)करुन घ्या.

कृती

शिजविलेल्या तुरीच्या डाळीस फोडणी देउन फोडणीचे पातळ वरण तयार करावयास ठेवा.त्यात चविसाठी चिंच,गुळ/साखर टाका.

कृती १) यात आता तयार केलेली फळे टाका. चांगले शिजु द्या.

कृती २) कणकीचे गोळे घेउन त्याच्या जाडसर पोळ्या लाटा,शंकरपाळयाच्या आकारात कापा .फोडणीचे पातळ वरणात चांगले शिजु द्या.

सजावट

यास सजावट नाही.चिरलेली कोथिंबीर टाकुन खाण्यास द्या.

इतर माहिती

ह्या पदार्थाला खान्देशात दाळचिखल्या आणि सातारा,सांगली येथे चकुल्या असे देखील म्हणतात.पोळ्या लाटण्यापासुन सुटका म्हणुन हा पदार्थ     पर्याय आहे.