Jump to content

ओवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओवा

ओवा (शास्त्रीय नाव: Trachyspermum copticum , ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम ; ) ही पश्चिम आशियादक्षिण आशियात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. याच्या बिया घरगुती वापरात असतात.

औषधी गुणधर्म

[संपादन]

पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक मसाल्याचा पदार्थ आहे.[] ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा (?) असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो. पराठे, खारी शंकरपाळे, पुरी इत्यादींमध्ये याचा वापर करतात.

उत्पादन

[संपादन]

लागवड

[संपादन]
  • ओवा ह्या पिकाची लागवड ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करतात. २ ते २.५ किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरतात.
  • दोन ओळीतील अंतर ३० सेमी तर दोन झाडातील अंतर ४५ सेमी ठेवतात

.

पिकाची कापणी

[संपादन]
  • ओवा हे पीक दोन महिन्यांमध्ये फुलधारणा करते आणि फळाचे तोंड विटकरी रंगाचे झाल्यानंतर तोडणीस योग्य आहे असे समजतात. अशी फळे तोडून चटईवर किंवा चादरीवर वाळवतात व हाताने किंवा पायाने घासून बी वेगळे करतात.

उत्पादन क्षेत्र

[संपादन]

भारत

[संपादन]

भारतात ओव्याचे पीक प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घेतले जाते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भावप्रकाश (संस्कृत भाषेत). यवानी पाचनी रुच्या तीक्ष्णोष्णा कटुका लघुः । दीपनी च तथा तिक्‍ता पित्तला शुक्रशूलहृत्‌ ।। वातश्‍लेष्मोदरानाह गुल्मप्लीहकृमिप्रणुत्‌ ।