११ मार्च २०१७ रोजी झालेल्या मतगणनेत काँग्रेसला सर्वाधिक २८ जागांवर तर भारतीय जनता पक्षाला २१ जागांवर विजय मिळाला. भाजपने स्थानिक पक्षांना हाताशी धरून सरकार स्थापन केले व एन. बिरेन सिंह राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले. गोव्याखालोखाल दुसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष असून देखील सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला अपयश आले. ईशान्य भारतामध्येआसाम व अरुणाचल प्रदेश नंतर मणिपूरमध्ये आपली सरकारे स्थापन करून भाजपने ह्या भागात आपली मुळे घट्ट केली.