नेहा मेहता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेहा मेहता
जन्म ९ जून, १९७८ (1978-06-09) (वय: ४५)
पाटण, गुजरात
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००१ ते आजतागायत
प्रमुख टीव्ही कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा
पती अविवाहित
धर्म हिंदू
NehaMehtaa

नेहा मेहता (जन्म: ९ जून, १९७८) ही एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी वरील अभिनेत्री आहे. भारतातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या सब टीव्ही वरील मालिका तारक मेहता का उलटा चष्मा मधील अंजली तारक मेहताच्या भूमिकेसाठी ती परिचित आहे.

नेहा मेहता मुळात गुजरातच्या भावनगरची असून तिचे वडोदरा आणि अहमदाबादमध्ये लहानपण गेले. ती गुजराती साहित्यात खोलवर रुजलेल्या कुटुंबातून आली आहे आणि ती स्वतः गुजराती वक्ता आहे. तिचे वडील एक लोकप्रिय लेखक आहेत ज्यांनी तिला अभिनेत्री होण्यासाठी प्रेरित केले. तिने मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स (एमपीए), इंडियन क्लासिकल डान्स आणि डिप्लोमा इन व्होकल आणि नाटकात पदवी मिळविली आहे.[१][२]

पूर्वायुष्य[संपादन]

नेहा मेहता यांनी बऱ्याच वर्षे गुजराती रंगमंचावर काम केले. इ.स. २००१ मध्ये झी टीव्ही चॅनेलवरील मालिका डॉलर बहु नावाच्या भारतीय दूरचित्रवाहिनीत अभिनय करून नेहा ने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली . नेहा मेहता यांनी इ.स. २००२ ते २००३ मध्ये स्टार प्लस वरील भाभी या मालिकेत मुख्य भूमिका निभावली.

इ.स. २००८ मध्ये सब टीव्ही वरील मालिका तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये अंजली मेहता नावाच्या पात्राची भूमिका निभावली. नेहाच्या अभिनय कारकिर्दीतील ही प्रदीर्घ भूमिका आहे. याव्यतिरिक्त तिने अजून एक सब टीव्ही वरील मालिका वाह! वाह! क्या बात है!चे शैलेश लोढा सह सूत्र संचालन केले [३][४][५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Best Gujarati Actress Neha Mehta | Tarak Mehta Fame | Interview by Devang Bhatt. YouTube. Retrieved on 19 June 2016.
  2. ^ Jain, Kiran (6 August 2015). "Revealed! You will be shocked to know the education qualifications of'Taarak Mehta…' star cast". Daily Bhaskar. 5 November 2018 रोजी पाहिले.
  3. ^ Home. SAB TV. Retrieved on 19 June 2016.
  4. ^ SAB TV. "Taarak Mehta Ka Ooltah Chashmah". Archived from the original on २४ मार्च २०१२. २० मे २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "Taarak Mehta's 500 episode celebration!". The Times of India. Archived from the original on १७ सप्टेंबर २०१३. २० मे २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]