Jump to content

ट्विंकल खन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्विंकल खन्ना
जन्म टीना जतिन खन्ना
२९ डिसेंबर, १९७४ (1974-12-29) (वय: ५०)
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, लेखिका, इंटीरियर डेकोरेटर
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९५ - २००१
वडील राजेश खन्ना
आई डिंपल कापडिया
पती अक्षय कुमार
नातेवाईक रिंकी खन्ना (बहीण)
पती अक्षय कुमार सोबत

ट्विंकल खन्ना (जन्म : पुणे, २९ डिसेंबर १९७४) ह्या एक लेखिका, चित्रपट निर्माती, वृत्तपत्रांत स्तंभलेखन करणारी आणि घरांच्या अंतर्सजावटीचा व्यवसाय करणारी माजी हिंदी सिने-अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्नाडिंपल कापडिया ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकल यांनी १९९५ साली चित्रपटगृहांत झळकलेल्या झालेल्या बरसात ह्या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जब प्यार किसी से होता है, बादशाह, मेला इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या ट्विंकल यांनी २००१ साली अक्षय कुमार सोबत विवाह झाल्यानंतर अभिनयसंन्यास घेतला.

ट्विंकल खन्‍ना यांनी लिहिलेल्या Mrs Funnybones या पहिल्याच पुस्तकाच्या एक लाखाहून अधिक प्रती खपल्यामुळे त्या २०१५ सालच्या सर्वाधिक लोकप्रिय लेखिका ठरल्या.

ट्विंकल खन्ना यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • Mrs Funnybones (प्रकाशन दिनांक १८ ऑगस्ट २०१५)
  • The Legend of Lakshmi Prasad (या लघुकथासंग्रहाचा ‘लक्ष्मीप्रसादची दंतकथा’ नावाचा मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण यांनी केला आहे.)
  • Pyjamas Are Forgiving (प्रकाशन दिनांक२३ जुलै २०१८)

बाह्य दुवे

[संपादन]