क्वेचुआ भाषा
Appearance
क्वेचुआ | |
---|---|
Qhichwa Simi, Runa Simi | |
स्थानिक वापर | दक्षिण अमेरिका खंडातील खालील देश: आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिले, पेरू, कोलंबिया, इक्वेडोर |
प्रदेश | मध्य आन्देस |
लोकसंख्या | १ कोटी |
लिपी | लॅटिन वर्णमाला |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | qu |
ISO ६३९-२ | que |
क्वेचुआ ही दक्षिण अमेरिका खंडात बोलली जाणारी एक मूळ अमेरिकन भाषा आहे. ही इंका साम्राज्यची भाषा होती. आज जवळजवळ १ कोटी लोक ही भाषा बोलतात. आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिले, कोलंबिया, इक्वेडोर व पेरू या देशांत ही बोलली जाते.
या भाषेतील वाक्यरचना मराठीप्रमाणेच कर्ता, कर्म व क्रियापद अशी असते. तसेच अनेक संधी व समास असतात.
बोलिव्हिया, व पेरू ह्या देशांमध्ये क्वेचुआचा प्रशासकीय वापर केला जातो.