कैलाश नाथ काटजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैलाश नाथ काटजू

कैलाशनाथ काटजू (१७ जून इ.स. १८८७ - १७ फेब्रुवारी इ.स. १९६८) हे भारतातील एक प्रमुख राजकारणी होते. ते ओरिसा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल होते, तसेच ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री होते. ते भारतातील सर्वात प्रमुख वकीलांपैकी एक होते.

काटजू यांनी भारतातील ब्रिटीश शासनाच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला आणि सहकारी स्वातंत्र्यसैनिकांसमवेत अनेक वर्षे कैद राहिले.

यांचे नातू मार्कंडेय काटजू भारताचे सरन्यायाधीश होते.