Jump to content

कृत्रिम भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृत्रिम भाषा किंवा नियोजित भाषा ही एक अशी भाषा असते जिचे उच्चारशास्त्र, व्याकरण व व्याकरण हे नैसर्गिकरित्या तयार झालेले नसून संपूर्ण मानवनिर्मित असते. ह्यास मानवनिर्मित भाषा असेही म्हणले जाते. कृत्रिम भाषा निर्माण करण्यासाठी अनेक हेतू असू शकतात, उदा. सुलभ व सोपा संवाद, काल्पनिक जगनिर्मिती, प्रयोग इत्यादी.

जुलै २०११ मधील एका पाहणीनुसार एस्पेरांतो, इंटरलिंग्वाक्लिंगॉन ह्या जगातील तीन सर्वाधिक वापरात असलेल्या कृत्रिम भाषा होत्या.

यादी

[संपादन]

खालील यादीमध्ये आय.एस.ओ. ६३९ ह्या प्रमाणाने मान्यता दिलेल्या कृत्रिम भाषा दिल्या आहेत.

भाषेचे नाव ISO प्रथम वापर निर्मिता
व्होलाप्युक vo, vol 1879–1880 योहान मार्टिन श्लेयर
एस्पेरांतो eo, epo 1887 एल.एल. झामेनहॉफ
इदो io, ido 1907 एस्पेरांतो भाषिकांचा एक समूह
ऑक्सिडेंटल ie, ile 1922 एड्गर दे वाह्ल
नोव्हियल nov 1928 ओट्टो जेस्परसन
इंटरलिंग्वा ia, ina 1951 इंटरनॅशनल ऑक्झिलियरी लॅंग्वेज असोसिएशन
लिंग्वा फ्रांका नोव्हा lfn 1998 सी. जॉर्ज बोएरी

बाह्य दुवे

[संपादन]