Jump to content

व्होलाप्युक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्होलाप्युक
Volapük
स्थानिक वापर प्रामुख्याने युरोप
भाषाकुळ
कृत्रिम भाषा
  • व्होलाप्युक
लिपी लॅटिन
भाषा संकेत
ISO ६३९-१ vo
ISO ६३९-२ vol
ISO ६३९-३ vol (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

व्होलाप्युक ही १९व्या शतकामध्ये तयार केली गेलेली एक कृत्रिम भाषा आहे. ह्या भाषेची रचना १८७९-१८८० दरम्यान जर्मन साम्राज्याच्या बाडेन येथील योहान मार्टिन श्लेयर ह्या ख्रिश्चन धर्मगुरूने केली. श्लेयरला आंतरराष्ट्रीय भाषा निर्माण करण्यासाठी देवाने आदेश दिला असे त्याचे म्हटणे होते. व्होलाप्युक भाषेच्या १८८४ मध्ये फ्रीडरिक्सहाफेन येथे, १८८७ मध्ये म्युन्शेन येथे तर १८८९ मध्ये पॅरिस ह्या तीन मोठ्या परिषदा भरवल्या गेल्या होत्या.

परंतु १८९० सालापासून व्होलाप्युकची लोकप्रियता घसरणीला लागली. व्होलाप्युक सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरू झाले. ह्याच दरम्यान एस्पेरांतो, इदो इत्यादी नव्या कृत्रिम भाषांचे आगमन झाले व व्होलाप्युक भाषा मागे पडत गेली.

बाह्य दुवे

[संपादन]