इंटरलिंग्वा
Appearance
इंटरलिंग्वा | |
---|---|
Interlingua | |
स्थानिक वापर | प्रामुख्याने युरोप |
भाषाकुळ |
कृत्रिम भाषा
|
लिपी | लॅटिन |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | ia |
ISO ६३९-२ | ina |
ISO ६३९-३ | ina[मृत दुवा] |
इंटरलिंग्वा ही २०व्या शतकामध्ये तयार केली गेलेली एक कृत्रिम भाषा लॅटिनचे आधुनिक रूप मानले जाते. ह्या भाषेची रचना १९३७ ते १९५१ दरम्यान आंतरराष्ट्रीय सहय्यक भाषा संस्था ह्या संघटनेने केली. एस्पेरांतो व इदोसह इंटरलिंग्वा ही जगातील सर्वाधिक वापर असलेली कृत्रिम भाषा समजली जाते. इंटरलिंग्वा जगातील अनेक नैसर्गिक भाषांमधील व्याकरण व शब्दकोशामधील समानता वापरून बनवली गेली आहे. इंटरलिंग्वाचे स्पॅनिशसोबत साधर्म्य आढळते. रोमान्स भाषासमूहामधील भाषा वापरणाऱ्या लाखो भाषिकांना इंटरलिंग्वा सहजपणे समजू शकते.
इंटरलिंग्वा भाषेची रचना करताना इंग्लिश, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज, जर्मन व रशियन ह्या भाषांमधील शब्दांचा व व्याकरण नियमांचा वापर करण्यात आला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत