कामेरी
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
?कामेरी नाट्यपंढरी, कृषीपंढरी, कबड्डीपट्टू महाराष्ट्र • भारत | |
— गाव ग्रामीण क्षेत्र — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | वाळवा व उरूण इस्लामपूर |
जिल्हा | सांगली जिल्हा |
लोकसंख्या | २०,००० (२०२१) |
भाषा | मराठी |
सरपंच | |
संसदीय मतदारसंघ | हातकणंगले |
विधानसभा मतदारसंघ | शिराळा |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 415403 • +०२३४२ • MH-10 |
कामेरी (तालुका वाळवा) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे २०,००० इतकी आहे. हे गाव शिराळा विधानसभा मतदार संघात मोडते.
गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर आहे. हे गाव कोल्हापूर पासून पश्चिमेला 40 किलोमीटर व कराड पासून 35 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. गावात बारा बलुतेदार व आठरा अलुतदार यांच्या बरोबर अनेक वस्ती आहेत. गावाच्या दक्षिणेला वारणा ही नदी 24 किलोमीटर व उत्तर बाजूस कृष्णा नदी 22 किलोमीटर आहे. उरुण इस्लामपूर पासून 4 किलोमीटर वर गाव वसले आहे. गावामध्ये विविध दैवताचे धार्मिक स्थळे आहेत. मुख्य भाषा मराठी असून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात.
कामेरी स्वातंत्र्य काळापासून आमदार रामचंद्र पाटील (कारभारी) स्वातंत्र्य नंतर आमदार के.डी. पाटील यांनी विधानसभा व विधानपरिषद प्रतिनिधित्व केले आहे.
कामेरी मध्ये कृषी क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व कृषिभूषण जगदीश शामराव पाटील व सिनेस्टार विलास यशवंत रकटे यांचे गाव असल्यामुळे कामेरी गावाला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. "नाट्यपंढरी, "कृषीपंढरी" ह्या नावानेही संबोधलं जातं.
कबड्डीपट्टू गाव अशीही कामेरीची ओळख आहे. कामेरी गाव हे कबड्डी पट्टूसाठी प्रसिद्ध आहे.
मुख्य पिके
[संपादन]ऊस, सोयाबीन, गहु, भाजीपाला ही सुद्धा प्रमुख पिकं म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात. कृषिभूषण जगदीश शामराव पाटील यांनी ऊस पिकावरील पहीला प्रयोग पुलअॅटोमायझेन ठिबक सिंचन भारतात प्रथम क्रमांकावर गणला आहे.
सैन्य भरती
[संपादन]गावातील बहुसंख्य युवक भारतीय लष्करामध्ये भरती झालेले आहेत. काश्मीर, पंजाब, राजस्थान, तसेच पूर्वेकडील अनेक राज्यामध्ये गावातील युवक सीमेवर पहारा देत आहेत. मिलिटरी कामेरी म्हणून या भागात ओळख निर्माण होत आहे.
कामेरी ग्रामपंचायत सदस्य
[संपादन]कामेरी ग्रामपंचायत निवडणूक सन 2022
- लोकनियुक्त सरपंच - श्री. रणजित जगदीश पाटील
- उपसरपंच - श्री. सूर्यकांत रंगराव पाटील - वार्ड नं. 2,
सदस्य-
- श्री. अमोल भिमराव कांबळे - वार्ड नं. 1,
- श्री. अभिजित रमेश आढाव - वार्ड नं. 1,
- श्री. काशिनाथ यशवंत रास्कर - वार्ड नं. 1,
- सौ. सुनिता नानासो खंडागळे - वार्ड नं. 2,
- सौ. सुजाता गोविंद पाटील - वार्ड नं. 2,
- श्री. इलाही अब्बास इनामदार - वार्ड नं. 3,
- श्री. सुभाष आनंदा बारपटे - वार्ड नं. 3,
- सौ. वैशाली पृथ्वीराज क्षीरसागर - वार्ड नं. 4,
- सौ. छायाबाई ज्ञानदेव पाटील - वार्ड नं. 4,
- सौ. शकुंतला संपत पाटील - वार्ड नं. 4,
- सौ. सुगराबी सिराज मगदुम - वार्ड नं. 5,
- सौ. अलका बाळासो पाटील - वार्ड नं. 5,
- श्री. शुभम तुकाराम पाटील - वार्ड नं. 5,
- सौ. वंदना संजय सुतार - वार्ड नं. 6,
- सौ. सोनाली काशिनाथ निंबाळकर - वॉर्ड नं. 6,
- श्री. विकास अशोक पाटील - वार्ड नं. 6,
हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
इतिहास
[संपादन]हे गाव पुणे - बेंगलोर हायवेवर वसले असून गावच्या सांगली च्या वायव्येस चाळिस किलोमीटरवर वसले आहे. त्यामुळे कराड, कोल्हापूर व विशेषतः सांगली या शहराकडे या गावातील लोकांची येजा असून त्याच्या उत्तरेस ४ किलोमीटर इस्लामपूर हे शहर वसले आहे. मदर इंडिया, टांगे वाला या हिंदी चित्रपटात व सुन माझी लक्ष्मी तसेच १२ मराठी चित्रपटात त्यांचे चित्रीकरण केले आहे. कामेरी गावात जशी श्री मारुती मंदिर आणि मस्जिद ही भव्य व सुदंर धार्मिक स्थळे आहेत. तसेच गावच्या पश्चिमेला श्री भवानी देवी व श्री अंबाबाई देवी, श्री बिरोबा मंदिर अशी अनेक सुंदर मंदिरे असून त्यातील श्री भवानी देवी व श्री अंबाबाई देवी, श्री कामेश्वरी या देवीच्या मूर्ती अतिसुदंर व देखण्या आहेत, मंदिराच्या समोरून सर्व आसमंत स्पष्ट व रम्य दिसतो. श्री भवानी टेकडीच्या पश्चिमेला एक छोटासा गुप्त कक्ष असून त्याचे दगडी फाडीचे इतिहासकालीन कोरीव बांधकाम असून शिल्प कलेचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते. दुरवरून इतिहासकार आणि ऎतिहासिक संशोधक त्या शिल्प कलेचा अभ्यास करण्या करीता येत असतात गावात इतिहाकालीन वास्तू कलेचा एक उत्तम रचना असलेला अतिभव्य वाडा होता सध्या बुरुज येथे पहावयास मिळतो. या वाड्याच्या परिसरातच श्री कामेश्वरी देवीचे मंदिर असून या देवीच्या नावावरून गावाला कामेरी हे नाव पडले. तसेच या वाड्यात इतिहास कालीन दगडी चिरेबंदी बांधकाम असलेले गुप्त भुयार आहे. कामेरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ हे असून ग्रामदैवता ची वैशाख शुद्ध नवमी या दिवशी मोठी यात्रा भरते या परिसरातील ही सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे बगाड…. बगाड म्हणजे बैलांच्या जोड्या जुंपलेले भले मोठे लांबलचक शिड जोडलेला मोठा लाकडी गाडा होय. या बगाडा इतके प्रचंड बगाड महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्याहि ठिकाणी पहावयास मिळत नाही अशी ख्याती आहे , या बगाडावर शंभर पेक्षा जास्त लोक एका वेळी बसू शकतात व 'श्री भैरवनाथाच्या नावान चांगभल' च्या गजरात यात्रेतील हे खास आकर्षण वाजत गाजत मिरवणुकीद्वारे काढले जाते.
प्रेक्षणीय किंवा पर्यटन स्थळे
[संपादन]कामेरीतील पर्यटन स्थळे ही अगदी मोजकीच आहेत, जी काही जणांसाठी एकांतातले भक्तीचे आध्यात्मिक स्थान, तर काही जणांसाठी पिकनिक पॉईंट तर काही जणांसाठी कपल्स् आणि जोडप्यांचे रमणीय ठिकाण वा मित्रांसाठी एकदिवसीय ट्रिपची एक प्रकारची अविस्मरणीय पर्वणीच आहे. यात प्रामुख्याने काही मंदिरे आणि काही बाह्य परिसरातील ठिकाणे आहेत. ज्यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश होतो.
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (छत्रपती शिवाजी पेठ)
- साता टिबी टेकडी, (दगडी खाणी जवळ)
- दुथाणी टेकडी, शिवपूरी रोड
- शिव खिड, (इटकरे कामेरी डोंगरी भागात)
- वशी खिड, (पेट्रोल पंप शेजारी)
- हुतात्मा स्मारक - विष्णू भाऊ बारपटे (नॅशनल हायवे जवळ, इस्लामपूर दत्त टेकडी रोड)
- सखाराम खंडू बारपटे (बारपटे मळा)
- ब्रिटिश अधिकारी यांचे थडगे (जूनी चावडीच्या मागील बाजूस)
- हत्तीची कोरवी दगडी शिल्प (जूनी चावडी इमारत जवळच)
- हत्तीची कोरवी दगडी शिल्प (गौराई गल्ली)
- हत्तीची कोरवी दगडी शिल्प (बाजारपेठ)
- दगडी बांधकाम मधील बुरुज अवशेष (कामेश्वरी चौक)
- गौराई दगडी विहीर (गौराई गल्ली)
- बगाडाची दगडी चाके (भैरवनाथ मंदिर परिसरात)
- लाकडी बगाड (भैरवनाथ मंदिर परिसरात)
- दगडी खाण (साता टिबी टेकडी परीसर)
- नक्षत्र उद्यान (सरकारी वैद्यकीय रुग्णालय परिसरात दत्त टेकडी रोड)
- तलाव (सरकारी वैद्यकीय रुग्णालय परिसरात दत्त टेकडी रोड)
- तलाव (गोपाल पाटील मळा रोड)
- तलाव (चौगुले मळा रोड)
- तलाव (दगडी खाणकाम परीसरात)
- लष्कर मैदान (दत्त टेकडी रोड)
- धनगर पाण्याचे आड (अहिल्याबाई होळकर चौक, [जूनी] धनगर गल्ली)
धार्मिक स्थळ
[संपादन]- श्री मारुती मंदिर (बाजारपेठ)
- श्री शनि देव (बाजारपेठ)
- श्री कामेश्वरी मंदिर (बाबर वाडा)
- श्री भैरवनाथ व जोगेश्वरी मंदिर (भवानी पेठ)
- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (भवानी पेठ)
- श्री नरसिंह मंदिर (भवानी पेठ)
- श्री थडाआई आणि यल्लामादेवी (पाटील गल्ली)
- श्री गणेश मंदिर (बारपटे गल्ली)
- श्री बिरोबा देवमाळी (जुनी चावडी जवळ)
- श्री घाटाई देवी (घाटाई चौक)
- श्री नरसोबा मंदिर (नरसोबा चौक)
- श्री महादेव मंदिर (देसाई वाडा,नरसोबा चौक)
- श्री दत्त मंदिर (नॅशनल हायवे जवळ)
- श्री लक्ष्मी मंदिर (नॅशनल हायवे जवळ)
- श्री राम मंदिर (पांडूरंग पाटील मळा)
- श्री बिरोबा मंदिर (छगनबापू नगर)
- श्री अंबाबाई मंदिर (छगनबापू नगर)
- श्री गौचार आप्पा मंदिर (क्रॅशर जवळ)
- श्री मरीआई मंदिर (कृषिभूषण जगदीशआप्पा रोड)
- श्री ऐताळबा मंदिर (कृषिभूषण जगदीशआप्पा रोड)
- श्री सटवाई मंदिर (तुजारपूर रोड)
- श्री रघुनाथ मंदिर (चौगुले मळा रोड)
- श्री पिलाई देवी (चौगुले मळा परीसर)
- श्री भवानी देवी मंदिर (चौगुले मळा)
- श्री मारुती मंदिर (कदम मळा)
- श्री खंडोबा मंदिर (पाटील-माळी मळा)
- श्री नागोबा मंदिर (गौराई विहीर जवळ)
- बाळगीरी मठ (राणीलक्ष्मीबाई पेठ)
- स्वामी मठ (जिल्हा बँक शेजारी)
- श्री महालक्ष्मी देवी मंदिर (पवार मळा,येडेनिपाणी-इस्लामपूर रोड)
- जैन मंदिर (गौराई चौक)
- शिव मंदिर (शिव खिड)
- पीर बुवाजी दर्गा (गौराई विहीर जवळ)
- पीर माशुमशहा दर्गा (टिपू सुलतान चौक)
- पीर शमशुद्दीन हुसेनी दर्गा (पिरजादे वाडा, टिपू सुलतान चौक)
- मुस्लिम मस्जिद (बाजारपेठ)
- चर्च (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर)
- चर्च (लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नगर)
शासकीय स्थानिक संस्था
[संपादन]- ग्रामपंचायत,कामेरी (नवीन इमारत बाजारपेठ जवळ)
- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालय (MSEB) कामेरी (स्वामी विवेकानंद चौक, हायस्कूल जवळ)
- सेतू कार्यालयात - कामेरी ग्रामपंचायत सेतू कार्यालय,कामेरी (कामेरी ग्रामपंचायत नवीन इमारत, बाजारपेठ जवळ)
- भारतीय संचार निगम विभाग,(BSNL) (छत्रपती शिवाजी महाराज पेठ)
- गावकामगार तलाठी कार्यालय, कामेरी (कामेरी ग्रामपंचायत नवीन इमारत,बाजारपेठ जवळ)
- मंडल अधिकारी कार्यालय, कामेरी (कामेरी ग्रामपंचायत नवीन इमारत,बाजारपेठ जवळ)
- गाव कामगार पोलीस पाटील कार्यालय (पोलीस पाटील मळा)
- मंडल कृषी विभागीय कार्यालय (ग्रामपंचायत नवीन इमारत)
आरोग्य सेवा केंद्र
[संपादन]आरोग्य केंद्र
- कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कामेरी (इस्लामपूर दत्त टेकडी रोड)
- कामेरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कामेरी (युवक क्रांती चौक)
- कामेरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कामेरी (हजरत टिपू सुलतान चौक)
- पशुपालन सरकारी वैद्यकीय रुग्णालय, कामेरी (श्री रघुनाथ मंदिर जवळच)
शैक्षणिक संस्था
[संपादन]- जिल्हा परीषद मुलाची शाळा (पश्चिम बाजूस नॅशनल हायवे जवळ)
- जिल्हा परीषद मुलीची शाळा (पश्चिम बाजूस नॅशनल हायवे जवळ)
- कर्मवीर शिक्षण संस्था,कामेरी (जिल्हा परिषद शाळा जवळ)
- एस.बी.दादा बालवाडी,(श्री भैरवनाथ मंदिर जवळ)
- आदर्श प्राथमिक विद्यालय,(भीमराव पाटील आण्णा सोसायटी जवळ)
- कन्या शाळा,(श्री रघुनाथ मंदिर जवळ)
- सुनंदा जाधव जुनियर कॉलेज,(शिवपुरी रोड)
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र,विभागीय कार्यालय कामेरी
- शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे विद्यालय,(पुर्व बाजूस नॅशनल हायवे जवळ)
- छगनबापू गर्ल्स हायस्कूल, (हुतात्मा स्मारक समोर)
- सिद्धीविनायक शिक्षण समुह, (पुर्व बाजूस नॅशनल हायवे जवळ)
- मॉडर्न आय.टी.आय.,कामेरी (कर्मवीर शिक्षण समुह)
- सहकार व्यवस्थापन पदविका,(डी.सी.एम.),कामेरी (कर्मवीर शिक्षण समुह)
- कामेरी गावात अंगणवाडी शाळा संख्या 11 आहेत
अर्थव्यवस्था
[संपादन]वाळवा तालुक्यातील कामेरी गावाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे मोलाचे स्थान आहे. कामेरी हे येथील दुधासाठीही प्रसिद्ध असून सहकारी व खाजगी दुग्धसंस्था इथे आहेत. गावातील सर्वच दुध संस्था मधील दूध कट्ट्यावर उत्तम प्रकारचे ताजे दूध मिळते.
बॅक
[संपादन]अधिकोष (इंग्लिश: Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय.
- युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा कामेरी (बाजारपेठ)
- सर्जेराव दादा नाईक शिराळा सह. बॅक लि; शिराळा शाखा कामेरी (बाजारपेठ जवळ)
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक लि;सांगली शाखा - कामेरी (दत्त चौक)
- कामेरी निधी मिनी बॅक लि;कामेरी (छत्रपती शिवाजी महाराज पेठ)
- बिलाल (बॅक मित्र) जन सेवा केंद्र (मस्जिद जवळ)
खाद्यसंस्कृती
[संपादन]एखादे गाव ठराविक गोष्टी साठी प्रसिद्ध असते ते तिथल्या खाद्य संस्कृती मुळे. पूना बेंगलोर रोड वर कामेरी हे गाव व तिथलं ढाबे खूप च प्रसिद्द आहेत. तिथे मिळणारा अक्खा मसूर सर्वदूर प्रसिद्ध आहे. कामेरी मध्ये मिळणारे प्रसिद्ध आणि रुचकर खाद्य पदार्थ म्हणजे कामेरी मिसळ. महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध मिसळ कामेरी मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिळते. उदा. माळी मिसळ, ऑक्सर मिसळ, विजय मिसळ, मिसळ, पाटील मिसळ वगैरे मांसाहारी खाद्य पदार्थांच्या संदर्भात कामेरीचा तांबडा रस्सा (मटणाचे सूप), पांढरा रस्सा (मटणाचे सूप फक्त पांढऱ्या रंगाचे), प्रसिद्ध आहेत.सध्या भारतातल्या बहुतेक हॉटेलांत व्हेज ग्रामीण चिकन हे पदार्थ उपलब्ध असतात; पांढरा तांबडा रस्सा, सुके मटण, खिमा हे प्रकार आख्ख्या कामेरीतील सर्व हाॅटेल मध्ये उपलब्ध होत असतात.
हाॅटेल
[संपादन]कामेरी गावांतील सभागृहे व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात येणारे ठिकाण
[संपादन]- भीमरावआण्णा पाटील सभागृह (जिल्हा बँक शेजारी)
- भीमरावआण्णा पाटील सोसायटी (जूनी इमारत, भैरवनाथ मंदिर)
- श्री. बिरोबा देवालय सभागृह (मल्हारराव होळकर चौक)
- श्री. अंबाबाई देवालय सभागृह (छगनबापू नगर)
- श्री. गणेश मंदिर सभागृह (बारपटे गल्ली)
- श्री. विठ्ठल रुक्मिणी देवालय मंडप (भवानी पेठ)
- बाजार पेठ (श्री.मारुती मंदिर)
- श्री. भैरवनाथ मंदिर प्रांगणात (भवानी पेठ)
- श्री. मारुती मंदिर प्रांगणात (बाजारपेठ)
- छगनबापू स्टेडियम (छत्रपतीं संभाजी महाराज पेठ)
- रंगरावआण्णा सभागृह (राजारामबापू चौक)
- कृषिभूषण जगदीशआप्पा सभागृह (पाणीपुरवठा संस्था)
- पीर बुवाहाजी दर्गा परीसर (गौराई चौक)
- बाळगिरी मठ सभागृह (बाळगिरी परिसरात)
- पीर माशुमशहा दर्गा (टिपू सुलतान चौक)
- जिल्हा परिषद शाळा (नॅशनल हायवे जवळच पश्चिम बाजूस)
- कर्मवीर शिक्षण समुह प्रांगणात (नॅशनल हायवे जवळच पश्चिम बाजूस)
- छगनबापू हायस्कूल प्रांगणात (नॅशनल हायवे जवळच पुर्व बाजूस)
वाहतूक व्यवस्था
[संपादन]कामेरी गाव रस्ते मार्गांने महाराष्ट्र व देशाच्या इतर शहरांसोबत जोडले गेले आहे. मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ४ कामेरी गावांमधून जातो. संपूर्णपणे चौपदरीकरण केलेल्या ह्या महामार्गाद्वारे पुणे, मुंबई सांगली, तसेच कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर इत्यादी शहरांपर्यंत जलद वाहतूक शक्य होते. अनेक राज्य महामार्ग कामेरीला कोकणाशी जोडतात.
भूगोल
[संपादन]कामेरी येडेनिपाणी सह. पाणी पुरवठा संस्थेकडून कृष्णा नदीच्या पाण्यामुळेच अतिशय सुपीक अशी जमीन कामेरीला लाभलेली आहे. त्यामुळे येथे चवदार भाजीपाला, ऊस पिकवला जातो. ज्वारी व बाजरी इथे बहरतात.
जैवविविधता
[संपादन]कामेरी परिसर वेगवेगळ्या वनस्पती व प्राण्यांनी समृद्ध आहे. कामेरी मधील लहानमोठ्या तलावांमुळे परिसर समृद्ध आहे.
लोकजीवन
[संपादन]कामेरी हे ग्रामीण ठिकाण असल्याने येथे सर्व वर्गातील लोक अगदी गुण्या-गोविंदाने राहतात. सर्व धर्माचे लोक आपली संस्कुती जतन करतात. कामेरी मध्ये ब-याच जातीचे लोक रहात असून सर्व भाऊ भाऊ प्रमाने वागत असतात. या ठिकाणी सोने-चांदी, शाकाहारी व मांसाहारी, मसूर स्पेशल हाॅटेल, लहान-मोठे दवाखाने , गॅरेज लाईन , किराणामालाचे दुकाने, बँक, मेडिकल, स्विटहोम , हार्डवेअर, प्लम्बींग, सलुन, पेट्रोल पंप, टपरी , पतसंस्था, मोबाईल शाॅप, दुध उत्पादन आणि महत्वाचा विषय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते.. इत्यादी....
प्रसारमाध्यमे
[संपादन]शैक्षणिक विकासाबरोबरच वृत्तपत्रांचा विकासही या कामेरी गावांत दिसून येतो. महाराष्ट्र मधून विविध ठिकाणांहून १९४५ मध्ये काही साप्ताहिके प्रकाशित होत असत. त्यांचे वितरण कामेरी मध्ये होत आहेत. तेव्हापासून कामेरी मधून वृत्तपत्रांची परंपरा आहे. कामेरी मधून लोकमत, पुढारी, सकाळ, दक्षिण महाराष्ट्र, केसरी, राष्ट्रशक्ती, जनप्रवास, आणि तरुण भारत ही वृत्तपत्रे प्रकाशित होतात.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]येडेनिपाणी, तुजारपूर, शिवपुरी, उरुण - इस्लामपूर, उरुणवाडी, वाळवा, वाघवाडी, इटकरे, विठ्ठलवाडी, वशी, इत्यादी
संदर्भ
[संपादन]- https://rajarambapusociety.com/[permanent dead link]
- http://www.mykameri.com Archived 2016-10-04 at the Wayback Machine.
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate