ओमप्रकाश चौटाला
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ਓਮ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਚੌਟਾਲਾ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जानेवारी १, इ.स. १९३५ सिरसा जिल्हा | ||
मृत्यू तारीख | डिसेंबर २०, इ.स. २०२४ गुरगांव | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वडील | |||
अपत्य |
| ||
| |||
ओमप्रकाश चौटाला (१ जानेवारी, १९३५:सिरसा, ब्रिटिश भारत — २० डिसेंबर, २०२४:गुरुग्राम, भारत) हे भारतामधील हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे नेते होते. भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत देवीलाल ह्यांचे चौटाला हे पुत्र होते.
मुख्यमंत्री असताना १९९९ ते २००० या काळात चौटाला यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन हजार शिक्षकांची भरती केली. या प्रकरणी सीबीआयने चौटाला आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध ६ जून २००८ मध्ये विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. १६ जानेवारी २०१३ रोजी यांच्यासह त्यांचा मुलगा अजय चौटाला व इतर ५३ जणांना न्यायालयात दोषी ठरविले गेले व अटक करण्यात आली. २२ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयाने यांना दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनाविली.[१][२]
चौटाला यांनी २०२१ मध्ये वयाच्या ८७व्या त्यांचे हायस्कूल आणि मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. चौटाला यांचे २० डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी त्यांच्या गुडगाव येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.[३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ "चौटाला पिता-पुत्रांना दहा वर्षांचा तुरुंगवास". दैनिक दिव्यमराठी. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "चौटाला यांना १० वर्ष शिक्षा". 2013-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-01-22 रोजी पाहिले.
- ^ संधू, कमलजीत (20 December 2024). "हरियाणा के पूर्व CM ओमप्रकाश चौटाला का निधन, 89 साल की उम्र में गुरुग्राम में ली अंतिम सांस". Aaj Tak (हिंदी भाषेत). 20 December 2024 रोजी पाहिले.