इमॅन्युएल रिवा
French actress (1927-2017) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Paulette Riva |
---|---|
जन्म तारीख | फेब्रुवारी २४, इ.स. १९२७ Cheniménil (व्हॉझ, फ्रान्स) Paulette Germaine Riva |
मृत्यू तारीख | जानेवारी २७, इ.स. २०१७ 16th arrondissement of Paris (फ्रान्स) |
मृत्युची पद्धत |
|
मृत्युचे कारण | |
चिरविश्रांतीस्थान |
|
टोपणनाव |
|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
कार्य कालावधी (अंत) |
|
नागरिकत्व | |
व्यवसाय |
|
सदस्यता |
|
कार्यक्षेत्र | |
मातृभाषा | |
पुरस्कार |
|
इमॅन्युएल रिवा (जन्म: पॉलेट जर्मेन रिवा; २४ फेब्रुवारी १९२७ – २७ जानेवारी २०१७) एक फ्रेंच अभिनेत्री होती जी हिरोशिमा मोन अमूर (१९५९) आणि अमूर (२०१२) या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होती.
हिरोशिमा मोन अमोर मधील भूमिकेसाठी रिवाला बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. थेरेस डेस्क्वेरॉक्स (१९६२) साठी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिने जिंकला होता. मायकेल हॅनेकेच्या अमूरमधील तिच्या मुख्य भूमिकेसाठी तिने बाफ्टा पुरस्कार आणि सीझर पुरस्कार जिंकला आणि अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
प्रारंभिक जीवन
[संपादन]रिवाचा जन्म २४ फेब्रुवारी १९२७ रोजी फ्रान्समधील चेनिमेनिल येथे पॉलेट जर्मेन रिवा असा झाला. [१] जीएन फर्नांडे (शिवणकाम) ही तिची आई हे रेने आल्फ्रेड रिवा (चित्रकार) तिचे वडील होते. [२]
रेमिरेमॉन्टमध्ये वाढलेल्या, रिवाने तिच्या स्थानिक थिएटरमध्ये नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड दर्शविली, परंतु तिने अनेक वर्षे आपल्या आई सारखे शिवणकामा केले. स्थानिक वृत्तपत्रातील जाहिरात पाहिल्यानंतर, रिवाने पॅरिसमधील एका अभिनय शाळेत अर्ज केला.[३]
वयाच्या २६ व्या वर्षी, ती तिच्या कुटुंबाच्या आक्षेपांना न जुमानता अभिनय करण्यासाठी पॅरिसला गेली.[२][४] १९५४ मध्ये, जॉर्ज बर्नार्ड शॉच्या आर्म्स अँड द मॅनच्या पॅरिस निर्मितीमध्ये तिने रंगमंचावर पहिली भूमिका केली. [३] १९५७ मध्ये, रिवाने एनिग्मेस डे लिहीस्टोरी या टीव्ही मालिकेतून पडद्यावरील अभिनयात पदार्पण केले.[५]
कारकीर्द
[संपादन]रिवा हिरोशिमा मोन अमूर (१९५९) मध्ये मुख्य भूमिकेत होती, जो ॲलेन रेसनाईस दिग्दर्शित आणि मार्गुरिट ड्युरास लिखित चित्रपट होता. ह्यामध्ये तिने हिरोशिमामधील जपानी आर्किटेक्ट (इजी ओकाडा) सोबत प्रेमसंबंध असलेल्या फ्रेंच अभिनेत्रीची भूमिका केली होती.[३] तिच्या अभिनयाला १९६० मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी अभिनेत्रीसाठी बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[५] त्यानंतर ती कपो (१९६०), लिओन मोरिन, प्रिस्ट (१९६१) आणि थेरेसे डेस्क्वेरॉक्स (१९६२) मध्ये दिसली, ज्यासाठी तिने व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २३ व्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी व्होल्पी कप जिंकला. रिवा थ्री कलर्स: ब्लू (१९९३), व्हीनस ब्युटी इन्स्टिट्यूट (१९९९), स्कायलॅब (२०११) [३] [४] आणि लॉस्ट इन पॅरिस (२०१६) चित्रपटामध्ये देखील दिसल्या.
रिवाने मायकेल हॅनेकेच्या अमूर (२०१२) या चित्रपटात जीन-लुईस ट्रिंटिग्नंट सोबत अभिनय केला. तिने तिच्या अभिनयासाठी २०१३ मध्ये प्रमुख भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार जिंकला. तिलासर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले, परंतु जेनिफर लॉरेन्सने सिल्व्हर लाइनिंग्ज प्लेबुक (२०१२) साठी हा जिंकला.[४] ८५ व्या वर्षी, जेव्हा तिला नामांकन मिळाले, तेव्हा रिवा ही सर्वात वयस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकित होती आणि ग्लोरिया स्टुअर्ट नंतरची दुसरी सर्वात वयस्कर अभिनय नामांकित व्यक्ती होती, जिचे वय ८७ होते जेव्हा तिला टायटॅनिक (१९९७) साठी नामांकन मिळाले होते.[६]
वैयक्तिक जीवन
[संपादन]रिवाने वैयक्तिक जीवन खाजगी ठेवले, लग्न केले नाही आणि मुलेही झाली नाहीत.[४] तिचा एक जोडीदार होता, जो १९९९ मध्ये मरण पावला.[३] रिवा पॅरिसच्या लॅटिन क्वार्टरमध्ये एका अपार्टमेंटच्या मालकीचे होते आणि अर्ध्या शतकाहून अधिक काळ तेथे राहत होती.[२]
२७ जानेवारी २०१७ रोजी पॅरिसमध्ये रिवाचा कर्करोगाने मृत्यू झाला, तिच्या ९० व्या वाढदिवसाच्या चार आठवडे आधी व ४ फेब्रुवारी २०१७ रोजी तिला चारोने स्मशानभूमीत पुरण्यात आले.[७][८]
संदर्भ
[संपादन]- ^ "Emmanuelle Riva: a life in pictures". 28 January 2017. 28 January 2017 रोजी पाहिले.
- ^ a b c "Emmanuelle Riva: 'I thank heaven for the child that's still in me'". 10 January 2015. 28 January 2017 रोजी पाहिले.
- ^ a b c d e "Renewed Love for Symbol of New Wave". 1 January 2013. 28 January 2017 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Emmanuelle Riva, French icon who starred in Amour, dies aged 89". 28 January 2017. 28 January 2017 रोजी पाहिले.
- ^ a b "'Amour' Star Emmanuelle Riva Dies: Oscar-Nominated Actress Was 89". IndieWire. 28 January 2017. 28 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "Oscars 2013: Records Broken for Oldest, Youngest Nominees". The Hollywood Reporter. 10 January 2013. 28 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "L'actrice Emmanuelle Riva enterrée dans la discrétion à Paris". Le Parisien. 4 February 2017. 14 August 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "Emmanuelle Riva enterrée en toute discrétion à Paris". Paris Match. 5 February 2017.