जेनिफर लॉरेन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेनिफर लॉरेन्स
स्थानिक नाव Jennifer Lawrence
जन्म जेनिफर श्रेडर लॉरेन्स
१५ ऑगस्ट, १९९० (1990-08-15) (वय: ३३)
लुईव्हिल, केंटकी
राष्ट्रीयत्व अमेरिका
कार्यक्षेत्र हॉलीवूड अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २००६ - चालू

जेनिफर लॉरेन्स (इंग्लिश: Jennifer Shrader Lawrence; १५ ऑगस्ट १९९०) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. २००६ सालापासून अमेरिकन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी लॉरेन्स २०१० सालच्या विंटर्ज बोन ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटासाठी तिला ऑस्करगोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. २०१२ सालच्या सिल्व्हर लाइनिंग प्लेबूक ह्या सिनेमासाठी लॉरेन्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: