इक्ष्वाकु
Appearance
(इक्ष्वाकू या पानावरून पुनर्निर्देशित)
इक्ष्वाकु (देवनागरी लेखनभेद: इक्ष्वाकू ; संस्कृत: इक्ष्वाकु ;) हा वैदिक काळातील इक्ष्वाकु कुळाचा संस्थापक व अयोध्येचा पहिला राजा होता. हिंदू पौराणिक संदर्भांनुसार वैवस्वत मनूच्या सहा पुत्रांपैकी हा एक होता. त्याला सुदेवा नावाची पत्नी व शंभर पुत्र होते. त्याच्यापासून सुरू झालेल्या इक्ष्वाकु कुळात भगीरथ, दशरथ, राम यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.
परिवार
[संपादन]पद्म पुराणानुसार इक्ष्वाकुला सुदेवा नामक पत्नी होती[१]. भागवत, देवी भागवत, महाभारत इत्यादी ग्रंथांनुसार यास विकुक्षी, दण्डक, दशाश्व इत्यादी शंभर पुत्र होते. इक्ष्वाकूनंतर विकुक्षी अयोध्येचा राजा झाला; दण्डक हा दंडकारण्याचा राजा बनला, तर दशाश्वाने माहिष्मतीवर राज्य केले[१].
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b सिद्धेश्वरशास्त्री चित्राव. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. p. ११३-११४.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |