इंदुप्रकाश
इंदुप्रकाश | |
---|---|
प्रकार | दैनिक |
प्रकाशक | विष्णूशास्त्री पंडित |
स्थापना | १८४० |
भाषा | मराठी |
प्रकाशन बंद | १८७६ |
मुख्यालय | महाराष्ट्र, भारत |
इंदुप्रकाश या वृत्तपत्राची सुरुवात आणि त्यानंतरच्या सुमारे तीस वर्षांनी जी वाटचाल पाहिली त्यात ज्ञानप्रसार, आणि खिस्त्री धर्मप्रचार व त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदूधर्माच्या बाजूने झालेले संरक्षणात्मक प्रयत्न या दोन प्रेरणा प्रमुख होत्या. याच काळात, येथील जनतेला आधुनिक संस्कृतीच्या मुलतत्त्वांनी परिचय होऊ लागला,पण जुनी समाजरचना अजून ढासळली नव्हती.
इतिहास
[संपादन]महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर जे विचारमंथन झाले त्यातून समन्वयप्रवण विचारसरणी सुसंगत पद्धतीने महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर प्रभृतींनी मांडण्याचा प्रयत्न केला. या मंडळीचे जीवन जात्याच धर्ममय व दुष्टीकोन आध्यात्मिक असल्याने त्याची बैठक धार्मिक वृत्तीला पारखी नव्हती. पण समग्र जीवनाचा साकल्याने विचार करून आपल्या पूर्वपरंपरेशी सुसंगत असा विचार या मंडळींनीं मांडला. त्यांची राजकीय विचारसरणी सरकारला विरोध करण्याची नव्हती. १८६२ साली मुंबईत निघालेले इंदुप्रकाश हे वृत्तपत्र या विचारसरणीचे एक प्रकारे मुखपत्र होते व १८६७ सालच्या मार्च महिन्यात स्थापन झालेला प्रार्थनासमाज हे तिचे व्यासपीठ होते.
पहिला अंक
[संपादन]मुंबईतील सुशिक्षितांत जागृत झालेल्या सुधारणा प्रवृत्तीचा अविष्कार करण्यासाठी वृत्तपत्रांची गरज भासू लागली. इंदुप्रकाश पत्र निघाले. 2 जानेवारी १८६२ रोजी या साप्ताहिक पत्राचा पहिला अंक बाहेर पडला मुंबई येथे २ जानेवारी १८६२ रोजी 'इंदुप्रकाश' हे साप्ताहिक वृत्तपत्र विष्णूशास्त्री पंडित यांनी सुरू झाले.मुंबईतील सुशिक्षित समाजात सुधारणेचे जे विचार जोपासले जात होते, त्या विचारांना पाठबळ देण्याचे कार्य 'इंदुप्रकाश'ने त्या काळात केले. वृत्तपत्र सुरू करण्यासाठी गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी प्रोत्साहन दिले. त्या काळातील इतर वृत्तपत्रांप्रमाणे 'इंदुप्रकाश' इंग्रजी व मराठी या दोन भाषांत निघत असे. मात्र इंग्रजी आणि मराठी मजकुरात सारखेपणा नसे. हे वृत्तपत्र सन १८६२ ते १९२४ अश्या एकंदर ६२ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात सुरू होते[१].
लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे आदींनी 'इंदुप्रकाश मध्ये लेखन केले. न्यायमूर्ती रानडे हे अत्यंत अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व होते त्यांना आधुनिक भारताचे अर्थशास्त्रचे जनक सुद्धा म्हणले जाते त्यांचे इंदुप्रकाश मधील कार्य खूप महत्त्वाचे आहे मात्र 'इंदुप्रकाश' खऱ्या अर्थाने गाजले ते विष्णू परशुरामशास्त्री पंडित यांच्यामुळे. विष्णूशास्त्री पंडित सरकारी नोकरी सोडून वृत्तपत्रक्षेत्रात आले होते.[२] १८६२ साली विष्णूशास्त्री पंडित यांनी 'इंदुप्रकाश'च्या संपादकपदाची जी धुरा हाती घेतली, ती १८७६ पर्यंत, म्हणजे मृत्यूपर्यंत धडाडीने सांभाळली. त्यांनी विधवा विवाहाचा हिरिरीने पुरस्कार केला. "नवमताची व नवविचाराची खळबळ उडवून देणारे पत्र म्हणून 'इंदुप्रकाश'पत्र प्रसिद्धी पावले"(१).
न्यायमूर्ती रानडे, नारायण महादेव उर्फ मामा परमानंद, नारायण गणेश चंदावरकर, ज.र.आजगावकर, मा.दा. अळतेकर, दिनकर सखाराम वर्दे, सखाराम पंडित, पु.गो.कानेकर, गणेश वामन तथा दादा गोगटे यांनी 'इंदुप्रकाश' चांगल्या रितीने चालविण्यास प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पूरक आणि ब्रिटिश वसाहतवादी राजवटीवर टीका करणारे लेखन यात होत असे.[३]
हे साप्ताहिक नंतर लोकमान्य या पत्रिकेत विलीन झाले. न्या.रानडे, न्या.तेलंग, चंदावरकर आणि पार्वती (?) यांचा इंदुप्रकाशच्या यशात वाटा होता.
इंदुप्रकाश मधील श्री अरविंद घोष यांचे लिखाण[edit]
[संपादन]श्रीअरविंद घोष यांचा India and the British Parliament हा लेख २६ जून १८९३ रोजी प्रकाशित झाला होता. तर New Lamps for Old या लेखमालेतील नऊ भाग ०७ ऑगस्ट १८९३ ते ०६ मार्च १८९४ या कालावधीत प्रकाशित झाले होते. New Lamps for Old (न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड) ही लेखमाला विशेष गाजली होती. त्यांत त्यांनी मवाळ धोरणासाठी काँग्रेसवर कठोर टीका केली होती.[४] या लेखमालेपासूनच श्रीअरविंद यांच्या सार्वजनिक जीवनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली होती. यातील पहिल्या २ लेखानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी चालकांना खबरदारीचा इशारा संपादकांना दिला. ही लेखमाला अशीच चालू राहिली तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी शक्यता त्यांनी वर्तविली.[५] त्यांनी लेखनाचा सूर थोडा मवाळ ठेवावा असा सल्ला त्यांना देण्यात आला, तेव्हा श्रीअरविंद यांचा इंदुप्रकाश मध्ये लेखनाचा उत्साह मावळला, तरीही त्यांनी दिल्या शब्दाला जागत ९ भागांची मालिका लिहून दिली.[६]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ लेले, रा. के. (२००९). मराठी वृत्तपत्राचा इतिहास. पुणे: अनिरुद्ध अनंत कुलकर्णी. pp. १४५.
- ^ "Induprakash - WikiVividly". wikivividly.com. 2018-08-23 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Tilak - PhalkeFactory". wiki.phalkefactory.net (इंग्रजी भाषेत). 2018-08-12 रोजी पाहिले.
- ^ "INDIAN NEWSPAPER REPORTS, c1868-1942: Parts 1 to 6". www.ampltd.co.uk. 2018-08-12 रोजी पाहिले.
- ^ Collected Works of Sri Aurobindo : Vol 06-07 & 36
- ^ Life of Sri Aurobindo by A.B.Purani