ॲलेक पदमसी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नाट्यदिग्दर्शक ॲलेक पदमसी हे ’द थिएटर ग्रुप मुंबई’चे संस्थापक व संचालक आहेत.
वयाच्या सातव्या वर्षी ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ नाटकापासून सुरुवात केलेल्या पदमसी यांनी ६० वर्षांत ७० इंग्रजी नाटकांतून भूमिका केल्या आहेत. मुंबईच्या इंग्रजी नाट्यवर्तुळात काम करताना पदमसी यांनी हिंदी नाटकेही केली. ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकापासून ते ‘शायद आपभी हॅंसे’ या नाटकापर्यंत त्यांनी अनेक उत्तमोत्तम नाटके केली. त्याशिवाय त्यांनी असंख्य जाहिराती आणि काही चित्रपट केले आहेत. कबीर बेदी, दलिप ताहिल, पर्ल पदमसी, शॅरॉन प्रभाकर, सबीरा मर्चंट, स्मिता पाटील यांच्यासारखे कलावंत त्यांच्या नाटकांमुळे घडले. शेक्सपिअर, आर्थर मिलर, टेनेसि विलियम्स या इंग्रजी लेखकांच्या नाटकाबरोबरच पदमसी यांनी प्रताप शर्मा, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, रिफत शमीम आणि इस्मत चुगताई या भारतीय नाटककारांची नाटकेही रंगमंचावर सादर केली आहेत.
रिचर्ड ॲटनबरोच्या ’गांधी’ चित्रपटातील जीनांची भूमिका ॲलेक पदमसी यांनी केली होती.
'डबल लाइफ' नावाचे आत्मचरित्रही त्यांनी लिहिलेले आहे.[१]
पुरस्कार
[संपादन]- पद्मश्री
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- टागोर रत्न पुरस्कार
- तन्वीर सन्मान - २०१५
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "अॅलेक पदमसी". ९ जून २०१६ रोजी पाहिले.