Jump to content

ॲग्रोव्हिजन, नागपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲग्रोव्हिजन हे विदर्भातले व मध्य भारतातले सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरू झाले व दरवर्षी आयोजित करण्यात येते.हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी असून यामध्ये कृषी ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान,प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यशाळा चर्चासत्र, जातीवंत पशुप्रदर्शन इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. दुग्ध व्यवसाय, शेती-पूरक व्यवसाय, भाजीपाला पिकविणे, हरितगृहे,कृषी वित्त पुरवठा, गटशेती, जैविक शेती,शेतमाल विपणन,पर्यायी इंधन, फुल शेती आदि अनेक विषयांवर शेतकऱ्यांना यात मार्गदर्शन देण्यात येते व यासाठी अनेक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. दृक-शाव्य माध्यमांद्वारे अनेक कृषीविषयक योग्य गोष्टीही प्रदर्शित करण्यात येतात. याशिवाय, जलसंधारण, पाण्याचे थेंबाचा अचूक वापर, शेतीविषयक तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी आयोजित करण्यात येतात.त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते, व फायदा वाढण्यास मदत होते.[][]

या प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल्स[मराठी शब्द सुचवा] लावण्यात येतात. शासकीय विभागांच्या स्टॉल्ससोबतच, अनेक खाजगी उत्पादक कंपन्यांचेही यात स्टॉल्स राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीबाबत, नव्या वाणाबाबत तसेच शेतीविषयक अनेक बाबींबाबतची माहिती एकाच ठिकाणी मिळते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b नरकेसरी प्रकाशन, नागपूर. तरुण भारत, नागपूर- आपले नागपूर पुरवणी पान क्र.१ व २ "उद्यापासून ॲग्रोव्हिजनचा दशकपूर्ती सोहळा" Check |दुवा= value (सहाय्य).[permanent dead link]
  2. ^ विशेष प्रतिनिधी. महाराष्ट्र टाईम्स.इंडियाटाईम्स.कॉमचे संकेतस्थळ "'ॲग्रोव्हिजन'साठी पंतप्रधानांना निमंत्रण" Check |दुवा= value (सहाय्य).[permanent dead link]