२०११ जपान भूकंप आणि त्सुनामी
![]() |
हा लेख एका सद्य घटनेबद्दल आहे. जसजशी माहिती उपलब्ध होईल तसतसा येथील मजकूर बदलण्याची शक्यता आहे. |
मियागी शहराजवळशुक्रवारी झालेला ८.९ रिश्टरचा भूकंप आणि त्सुनामी यामुळे जपानच्या अणुऊर्जानिर्मिती केंद्रांना धोका निर्माण झाला आहे. महाभयंकर संकटाने हादरलेल्या फुकूशिमायेथील एका अणुऊर्जा केंद्रात स्फोट झाल्यामुळे चार कर्मचारी जखमी झाले आहेत.स्फोटामुळे अणुऊर्जा केंद्रातून किरणोत्सर्ग सुरू झाला आहे.
शुक्रवारच्यानैसर्गिक आपत्तीनंतर फुकूशिमा येथील अणुऊर्जा केंद्रातून मोठ्या प्रमाणावरकिरणोत्सर्ग सुरू झाला होता. त्यामुळे अणुऊर्जा केंद्रात दूर्घटना होण्याची शक्यताव्यक्त होत होती. अखेर शनिवारी ही भीती खरी ठरली. स्फोटानंतर अणुऊर्जा केंद्रातूनधूर येत असून वीज पुरवठा खंडीत झाला आहे, असे जपानी वृत्तवाहिन्यांनीसांगितले.
याआधी शुक्रवारी जपानच्या पूर्व किनारपट्टीला भूकंप आणित्सुनामीचा फटका बसल्यानंतर फुकूशिमातील प्रकल्पासह देशातील पाच अणुऊर्जाकेंद्रांमध्ये काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच अणुऊर्जाप्रकल्पांभोवताली राहणा-यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरूकरण्यात आली होती.
updated by Omprakashji Korde

इ.स. २०११ जपान भूकंप आणि त्सुनामी ही मार्च ११, इ.स. २०११ रोजी घडलेली नैसर्गिक आपत्ती होती. यात जपानमध्ये प्राथमिक अंदाजानुसार शेकडो बळी गेले आणि १० अब्ज अमेरिकन डॉलरांचे नुकसान झाले.
अनुक्रमणिका
भूकंप[संपादन]
मार्च ११, इ.स. २०११ रोजी जपानाच्या किनारपट्ट्यांना त्सुनामीचा तडाखा बसला. जपानी प्रमाणवेळेनुसार दुपारी २.४६ वाजता जपानाच्या किनाऱ्यापासून १२५ कि.मी. अंतरावर सुमारे १० कि.मी. खोलीवर ८.९ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या त्सुनामीने काही मिनिटांतच किनारपट्टी गाठली. केवळ किनारपट्टीशीच न थांबता ही त्सुनामी किनाऱ्यापासून आत अनेक कि.मी. अंतरापर्यंत पसरत गेली. जमिनीवर पसरताना या लाटेने किनाऱ्याजवळच्या मोठ्या जहाजांना तर आपल्या कवेत घेतलेच; सोबत रस्त्यांवरील मोटारी, घरे आदींसह जे काही वाटेत आले ते सगळेच गिळंकृत केले.
त्सुनामी[संपादन]
मियागीजवळील समुद्रात ३३ फुटांहून अधिक उंचीच्या लाटा उसळल्या. त्यात अनेक जहाजे वाहून गेली. त्सुनामीच्या लाटा किनारपट्टीपासून कित्येक किलोमीटर आतपर्यंत शिरल्याने मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. त्सुनामीचा तडाखा एवढा जबरदस्त होता, की उत्तर जपानातले रस्ते उखडून वर आले. लाव्हारस बाहेर पडावा, त्याप्रमाणे प्रचंड वेगाने त्सुनामीचे पाणी आपल्या वाटेत येणाऱ्या सर्व गोष्टी घेऊन कित्येक किलोमीटर आत घुसले. तोक्यो आणि परिसरातील सुमारे ४० लाख घरांतील विद्युतप्रवाह खंडित झाला [१]
संदर्भ[संपादन]
- ^ "जपानमध्ये आण्विक आणीबाणी" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स.
बाह्य दुवे[संपादन]
- यूएस जिऑलजिकल सर्व्हे - भूकंपाचा सर्वेक्षण अहवाल (इंग्लिश मजकूर)
- इंटिग्रेटेड त्सुनामी वॉचर सर्व्हिस (इंग्लिश मजकूर)