२०१० हैती भूकंप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भूकंपाचे केंद्र

२०१० हैती भूकंप हा कॅरिबियनमधील हैती ध्वज हैती ह्या देशात झालेला एक विनाशक भूकंप होता. मंगळवार, जानेवारी १२ २०१० रोजी दुपारी ४:१३ वाजता झालेल्या व रिश्टर स्केलवर ७.० एवढ्या क्षमतेने मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट-औ-प्रिन्सच्या २५ किमी पश्चिमेला होते.

भूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन

ह्या भूकंपाने हैतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी घडवून आणली. सुमारे २ ते ३ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ह्या भूकंपाचे आजवरील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती असे वर्णन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी हैतीला मदत करण्यात पुढाकार घेतला होता. हैती सरकारच्या अंदाजानुसार २,५०,००० घरे आणि ३०,००० इतर इमारती या भूकंपात नष्ट झाल्या.[१]

  1. ^ रेन्वा, क्लॅरेन्स (२०१०-०२-०५). "Haitians angry over slow aid". द एज (२०१०-०२-०५). (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 7 February 2010 रोजी मिळवली). 5 February 2010 रोजी पाहिले.