Jump to content

होंगलौ मंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होंगलौ मंग, अर्थात लाल महालातील स्वप्न, या कादंबरीच्या च्याशू प्रतीचे एक पान

होंगलौ मंग (अन्य मराठी लेखनभेद: होंगलौ मेंग ; सोपी चिनी लिपी: 红楼梦 ; पारंपरिक चिनी लिपी: 紅樓夢 ; फीनयीन: Hóng Lóu Mèng ; वेड-जाइल्स: Hung Lou Meng ; इंग्लिश: Dream of the Red Chamber, ड्रीम ऑफ द रेड चेंबर ;), अर्थात लाल महालातील स्वप्न, ही छिंगकालीन चिनी लेखक त्साओ श्वेछिन याने लिहिलेली चिनी कादंबरी आहे. चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्यांपैकी ही एक असल्याचे मानले जाते. ज्ञात पुराव्यांनुसार इ.स. १७५९ साली पहिल्या हस्तलिखित प्रती प्रसिद्ध झालेली ही कादंबरी इ.स.चे १८ व्या शतकाच्या मध्यावर लिहिली गेली, असे मानले जाते.

मूळ कादंबरीची पहिली ८० प्रकरणे त्साओ श्वेछिनाने लिहिली. त्याच्या मृत्यूनंतर अन्य संपादक-लेखकांनी त्यांत ४० प्रकरणांची भर घातल्यावर या कादंबरीस सध्या ज्ञात असलेले १२० प्रकरणांच्या कादंबरीचे स्वरूप मिळाले.

एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या, मात्र कालौघात उतरती कळा लागलेल्या सरंजामी घराण्याच्या पटावर रेखलेल्या या कादंबरीत त्साओ श्वेछिनाने काही अंशी आत्मचरित्र लिहिले आहे, असा काही तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. कादंबरीच्या पहिल्या प्रकरणात खुद्द लेखकाने तारुण्यातील काळात आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांच्या - नात्यांतील तसेच घरातील दासी / सेविका, मैत्रिणी यांच्या - स्मरणार्थ हे लिखाण केल्याचे नोंदवले आहे. पुष्कळ पात्रे असलेल्या या कादंबरीत मानवी भावभावनांचे, माणसांच्या स्वभावांचे व त्यांतून उद्भवणाऱ्या त्यांच्यांतील क्रिया-प्रतिक्रियांचे प्रभावी चित्रण असून इ.स.च्या १८ व्या शतकातील चिनी समाजातील सरंजामी उतरंडीचे व जीवनाचे तपशीलवार वर्णन आहे.

बाह्य दुवे

[संपादन]