चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या
Appearance
(सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या या पानावरून पुनर्निर्देशित)
{四大名著 ; फीनयीन:} sì dà míng zhù, सी ता मिंग चू ; इंग्लिश: Four Great Classical Novels, फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स ;)
चिनी साहित्यात प्रभावी मानल्या जाणाऱ्या अशा सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणाऱ्या या कादंबऱ्यांवरून प्रेरणा घेऊन ललितकला माध्यमांत अनेक कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी नव्या निर्मिती झाल्या असून चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इत्यादी पूर्व आशियातील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.
- कालक्रमानुसार त्या चार कादंबऱ्या खालीलप्रमाणे आहेत
- सान कुओ यान यी, अर्थात तीन राज्यांमधील प्रणयकथा, (चिनी: 三國演義; फीनयीन: sān guó yǎn yì ;) (इ.स.चे १४ वे शतक)
- ष्वी हू च्वान, अर्थात दलदलीत राहणारी माणसे, (चिनी: 水滸傳; फीनयीन: shuǐ hǔ zhuàn ;) (इ.स.चे १४ वे शतक)
- शी यौ ची, अर्थात पश्चिमेकडील यात्रा, (चिनी: 西遊記; फीनयीन: xī yóu jì ;) (इ.स.चे १६ वे शतक)
- होंगलौ मंग, अर्थात लाल महालातील स्वप्न (चिनी: 紅樓夢; फीनयीन: hóng lóu mèng ;) (इ.स.चे १८ वे शतक)