हेलन हंट
हेलन एलिझाबेथ हंट (जून १५, इ.स. १९६३:कल्व्हर सिटी, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही ऑस्कर पुरस्कारविजेती अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे.
हिने ट्विस्टर, कास्ट अवे, व्हॉट विमेन वॉन्ट, पे इट फॉरवर्ड, ॲझ गूड ॲझ इट गेट्स सह अनेक चित्रपटांत व मॅड अबाउट यू, द स्विस फॅमिली रॉबिन्सन सह अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
हंटला ॲझ गूड ॲझ इट गेट्स चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. याशिवाय तिला चार एमी पुरस्कार, चार गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दोन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाले आहेत.