सदाशिव मार्तंड गर्गे
सदाशिव मार्तंड गर्गे (जन्म : लहुरी-बीड, ४ नोव्हेंबर १९२०; - ४ नोव्हेंबर २००५) हे मराठी पत्रकार, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ होते.
गर्ग्यांना मराठी, फारसी व उर्दू या भाषा येत होत्या. त्यांनी मोडी लिपीही अभ्यासली होती. पेशाने पत्रकार असलेल्या गर्ग्यांनी नागपुरात 'तरुण भारत' आणि पुण्यात 'सकाळ' व 'विशाल सह्याद्री' या वृत्तपत्रांतून २७ वर्षे पत्रकारिता केली.
वैवाहिक जीवन
[संपादन]मूळच्या मराठवाड्यातील अंबेजोगाईच्या असणा्या लीलाताई गर्गे या स.मा. गर्ग्यांच्या पत्नी होत्या. इ.स. २००९ साली लीलाताईंचा मृत्यू झाला.
प्रकाशित साहित्य
[संपादन]'भारतीय समाजविज्ञान कोश' हे गर्ग्यांचे महत्कार्य आहे. सुमारे आठ-दहा वर्षे प्रचंड परिश्रम करून, शंभराहून जास्त लेखकांकडून नोंदी लिहून घेऊन सहा खंडांत त्यांनी हा कोश प्रकाशित केला. यांचे खालील साहित्य प्रकाशित झाले आहे :
- आकांक्षा पत्रकारितेची
- इतिहासाची साधने : एक शोधयात्रा
- करवीर रियासत
- गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र
- भारताचा स्वातंत्र्यसंग्राम
- भारतीय समाज विज्ञान कोश (सहा खंड)
- भारतीय समाजविज्ञान कोश : पारिभाषिक शब्दसंग्रह (पुरवणी खंडातील पारिभाषिक शब्द संग्रहासह)
- राज्यशास्त्राचा विकास
- समाजवादी समाजरचना
- समाजविज्ञान आणि संस्कृती
- स्वप्न आणि सत्य
- शांतिपर्वातील कथा
- हिंदुराव घोरपडे घराण्याचा इतिहास
संस्थात्मक कार्य
[संपादन]स.मा. गर्गे हे अखिल भारतीय इतिहास अभ्यास परिषदेच्या अध्यक्षपदी काही काळ काम करत होते. 'मराठवाडा मित्रमंडळ' ही संस्थाही त्यांनी स्थापली.
पुरस्कार
[संपादन]- गर्ग्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती बहाल केली. त्यांना प्रज्ञावंत पुरस्कारही मिळाला.
- स.मा. गर्गे यांच्या नावाने एखाद्या विशेष विषयावरील ग्रंथाला 'समाजविज्ञान कोषकर्ते गर्गे' नावाचे पारितोषिक दिले जाते. पंकज कालुवाला यांच्या 'राजकीय हत्या' या पुस्तकाला हे पारितोषिक मिळाले आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- महाराष्ट्र टाइम्समधील लेख Archived 2007-03-11 at the Wayback Machine.