सदाशिव मार्तंड गर्गे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सदाशिव मार्तंड गर्गे (जन्म : लहुरी-बीड, ४ नोव्हेंबर १९२०; - ४ नोव्हेंबर २००५) हे मराठी पत्रकार, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ होते.

गर्ग्यांना मराठी, फारसीउर्दू या भाषा येत होत्या. त्यांनी मोडी लिपीही अभ्यासली होती. पेशाने पत्रकार असलेल्या गर्ग्यांनी नागपुरात 'तरुण भारत' आणि पुण्यात 'सकाळ' व 'विशाल सह्याद्री' या वृत्तपत्रांतून २७ वर्षे पत्रकारिता केली.

वैवाहिक जीवन[संपादन]

मूळच्या मराठवाड्यातील अंबेजोगाईच्या असणा्या लीलाताई गर्गे या स.मा. गर्ग्यांच्या पत्नी होत्या. इ.स. २००९ साली लीलाताईंचा मृत्यू झाला.

प्रकाशित साहित्य[संपादन]

'भारतीय समाजविज्ञान कोश' हे गर्ग्यांचे महत्कार्य आहे. सुमारे आठ-दहा वर्षे प्रचंड परिश्रम करून, शंभराहून जास्त लेखकांकडून नोंदी लिहून घेऊन सहा खंडांत त्यांनी हा कोश प्रकाशित केला. यांचे खालील साहित्य प्रकाशित झाले आहे :

  • आकांक्षा पत्रकारितेची
  • इतिहासाची साधने : एक शोधयात्रा
  • करवीर रियासत
  • गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र
  • भारताचा स्वातंत्र्यसंग्राम
  • भारतीय समाज विज्ञान कोश (सहा खंड)
  • भारतीय समाजविज्ञान कोश : पारिभाषिक शब्दसंग्रह (पुरवणी खंडातील पारिभाषिक शब्द संग्रहासह)
  • राज्यशास्त्राचा विकास
  • समाजवादी समाजरचना
  • समाजविज्ञान आणि संस्कृती
  • स्वप्न आणि सत्य
  • शांतिपर्वातील कथा
  • हिंदुराव घोरपडे घराण्याचा इतिहास

संस्थात्मक कार्य[संपादन]

स.मा. गर्गे हे अखिल भारतीय इतिहास अभ्यास परिषदेच्या अध्यक्षपदी काही काळ काम करत होते. 'मराठवाडा मित्रमंडळ' ही संस्थाही त्यांनी स्थापली.

पुरस्कार[संपादन]

  • गर्ग्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती बहाल केली. त्यांना प्रज्ञावंत पुरस्कारही मिळाला.
  • स.मा. गर्गे यांच्या नावाने एखाद्या विशेष विषयावरील ग्रंथाला 'समाजविज्ञान कोषकर्ते गर्गे' नावाचे पारितोषिक दिले जाते. पंकज कालुवाला यांच्या 'राजकीय हत्या' या पुस्तकाला हे पारितोषिक मिळाले आहे.

बाह्य दुवे[संपादन]