स्वाती दांडेकर
Appearance
स्वाती दांडेकर (६ मार्च, १९५१ - ) या अमेरिकेतील आयोवा राज्याच्या माजी प्रतिनिधी आहेत. या २००३- ९ दरम्यान आयोवाच्या ३६व्या डिस्ट्रिक्टमधून आयोवाच्या प्रतिनिधीगृहावर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर त्या २००९-११ दरम्यान आयोवाच्या १८व्या डिस्ट्रिक्टमधून आयोवाच्या सेनेटवर निवडून गेल्या.
दांडेकर यांनी जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रात नागपूर विद्यापीठातून पदवी घेतला आहे आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी आहारशास्त्रात स्नातकोत्तर पदविका घेतली आहे.