स्त्री साहित्य कला संमेलन
Appearance
(स्त्रीसाहित्य कलासंमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)
पिंपरी चिंचवड येथील स्वानंद महिला संस्था व भारतीय जैन संघटना या दरचर्षी एक स्त्री साहित्य संमेलन भरवतात. अशा आणि काही इतर स्त्री साहित्य संमेलनांचा हा तपशील :
- २७वे : मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी व हिंदवाडी महिला मंडळतर्फे २७वे महिला साहित्य संमेलन दि. ९ फेब्रुवारी रोजी बेळगावात झाले. संमेलनाध्यक्षा लेखिका मंगला गोडबोले होत्या.
- १७वे स्त्री साहित्य विचारवेध संमेलन ११ ऑक्टोबर २०१३ रोजी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटना यांनी पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे भरवले होते. संमेलनाध्यक्षा डॉ. आश्विनी धोंगडे होत्या.
- १२वे : अनुष्का स्त्री मंच या संस्थेने भरविलेले १२वे अनुष्का स्त्री साहित्य कला संमेलन, निगडी येथे ६ फेब्रुवारी २०१४ रोजी झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. विजया वाड होत्या.
- ११वे : स्वानंद महिला संस्था पिंपरी (पुणे)तर्फे आयोजित अखिल भारतीय अकराव्या स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी म्हसावद (ता. जळगाव) येथील प्रा. विमल वाणी होत्या. यांची निवड करण्यात आली. २५ फेब्रुवारीला २०१४ला हे हे साहित्य संमेलन होत आहे.
- १०वे : शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेने भरविलेले १०वे गोमंतक महिला साहित्य संमेलन इंगोंडा (गोवा) तेथे झाले.
- ९वे संमेलन पिंपरीत १ फेब्रुवारी २०११ रोजी झाले होते. संमेलनाध्यक्षा डॉ. श्यामा घोणसे होत्या.
- ८वे स्त्री साहित्य कला संमेलन पिंपरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी झाले होते. संमेलनाध्यक्षा डॉ. नलिनी जोशी होत्या.
- ४थे : सावंतवाडीत ८,९,१० नोव्हेंबरला कोकण मराठी साहित्य परिषदेचे चौथे महिला साहित्य संमेलन संपन्न झाले. अध्यक्षा अचलाताई जोशी होत्या.
- ३रे : कोकण मराठी साहित्य परिषदेचे तिसरे महिला साहित्य संमेलन वाशी(नवी मुंबई) येथे झाले. त्याच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे होत्या.
- २रे : कोकण मराठी साहित्य परिषदेचे दुसरे महिला साहित्य संमेलन २००८ साली रत्नागिरी येथे झाले. अध्यक्षा वीणा गवाणकर होत्या.
- १ले : आवास येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्रातील पहिले महिला साहित्य संमेलन संपन्न झाले, ज्याच्या अध्यक्षा डॉ. ताराबाई भवाळकर होत्या.
- १ले : स्त्रियांचे पहिले साहित्य संमेलन २९ सप्टेंबर २०१३ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रवळनाथ मंदिर परिसरात भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून लेखिका प्रतिमा जोशी होत्या.[१] कोल्हापूरच्या ’दिशा सामाजिक संस्थे’ने हे संमेलन भरविले होते.
- १ले : साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे १ले स्त्री साहित्य संमेलन. पुणे, ३०-१२-२०१७ रोजी. अध्यक्षा कवयित्री उषा मेहता.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ प्रतिमा जोशी. "वैचारिक समानताच देईल स्त्रीला प्रतिष्ठा". २४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]
पहा : साहित्य संमेलने