सोनालिका जोशी
सोनालिका जोशी या एक मराठी अभिनेत्री असून त्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत माधवी आत्माराम भीडे म्हणून प्रसिद्ध आहेत.
| सोनालिका जोशी | |
|---|---|
![]() | |
| जन्म |
सोनालिका कांबळे ५ जून, १९७६ मुंबई, महाराष्ट्र |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| भाषा | मराठी |
| प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम | तारक मेहता का उल्टा चष्मा |
| पती |
समीर जोशी (ल. २००१) |
| अपत्ये | 1 |
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]जोशी यांनी इतिहास फॅशन डिझायनिंग आणि थिएटरमध्ये बीए पूर्ण केले आहे.[१] २००१ साली त्यांचे लग्न समीर जोशी यांच्याशी झाले आणि त्यांना एक मुलगी, आर्या जोशी आहे.[२] एका मुलाखतीनुसार जोशी यांचे विवाहपूर्वीचे आडनाव कांबळे असल्याने त्यांच्याशी अभिनय क्षेत्रात भेदभाव करण्यात आला होता.[३]
कारकिर्द
[संपादन]जोशी यांनी त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला बायको असून शेजारी, वाढता वाढता वाढे, बोल बच्चन, चौकोन इत्यादी नाटकांमध्ये काम केले आहे. नंतर त्यांनी पाऊस येता येता, किमयागार, महाश्वेता, नायक, एक श्वासाचे अंतर, जगावेगळी इत्यादी मराठी टीव्ही मालिका आणि काही टीव्ही जाहिराती केल्या. २००८ पासून, त्या तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये माधवी भिडेची भूमिका मंदार चांदवडकर सोबत करत आहेत.[४][५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Revealed! You will be shocked to know the education qualifications of 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma' star cast". Dainik Bhaskar. 9 August 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 October 2016 रोजी पाहिले.
- ^ "Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Madhavi Bhabhi Real Avatars- m.bhaskar.com". 1 March 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "ही कांबळे, आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही, आडनावामुळं कामं गेली..सोनालिका जोशीनं केली मराठी सिनेइंडस्ट्रीची पोलखोल". महाराष्ट्र टाइम्स. २ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Matpal: Sonalika Joshi [Biography] Madhavi Bhide in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah". Jan 2013. 29 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "Taarak Mehta's 500 episode celebration!". The Times of India. 18 December 2010. 15 August 2018 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील सोनालिका जोशी चे पान (इंग्लिश मजकूर)
