सेंट बेसिल कॅथेड्रल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉस्कोमधील सेंट बेसिल कॅथेड्रल

सेंट बेसिल कॅथेड्रल (रशियन: Собор Василия Блаженного) हे रशिया देशाच्या मॉस्को शहरातील लाल चौकामध्ये स्थित असलेले एक ऐतिहासिक चर्च आहे. १६५५ साली तत्कालीन झार इव्हान द टेरिबलने कझानआस्त्राखानवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी हे चर्च बांदण्याचा आदेश दिला. १२ जुलै १५६१ रोजी बांधून पूर्ण झालेले हे चर्च मॉस्को क्रेमलिनचा भाग असून ते मॉस्कोमधील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. ह्या चर्चची वास्तूरचना रशियामधील इमारतींपेक्षा पूर्णपणे वेगळी असून ह्यासमान रचनेची इतर एकही इमारत रशियामध्ये अस्तित्वात नाही.

ह्या इमारतीमधील रंगरचना रात्रीच्या वेळी खुलून दिसते.

सोव्हिएत संघाच्या नास्तिकतेच्या धोरणांमुळे सोव्हिएत सरकारने १९२८ साली हे चर्च ताब्यात घेतले व येथील धार्मिक कामकाज पूर्णपणे थांबवले. आजही हे चर्च रशिया सरकारच्या मालकीचे असून ते एक वस्तूसंग्रहालय म्हणून वापरले जाते. १९९० सालापासून ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 55°45′9″N 37°37′23″E / 55.75250°N 37.62306°E / 55.75250; 37.62306