सृष्टीत...गोष्टीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

सृष्टीत...गोष्टीत हे डॉ. अनिल अवचट यांनी लिहिलेले पुस्तक आहे. बालसाहित्य या प्रकारात या पुस्तकाचा समावेश होतो. या पुस्तकासाठी अवचट यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारही मिळालेला आहे.

आयुष्यभर एक अवघड लहान मूल आपल्या काळजात जपून ठेवणारे ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट तथा सगळ्यांचे लाडके बाबा म्हणजे एक अवलियाच! आपलं अवघं आयुष्य मनःपूर्वकतेने जगलेला हा माणूस! एरवी गोरगरीब, दीनदलितांसाठी त्यांची लेखणी झिजली. गरिबांचे वंचितांचे एक वेगळेच जग आहे. त्यांच्या जगण्यातील संघर्ष त्यांनी सतत टिपला. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारा हा माणूस. मुलांमध्ये मात्र मूल होऊन रमून जायचा. साहित्य अकादमीने बालसाहित्यातील पुरस्कार देणे सुरू केले आणि मराठीतील बाल वाङमयाचा पहिला पुरस्कार अनिल अवचट यांच्या *सृष्टीत... गोष्टीत* या पुस्तकाला जाहीर झाला. गंमत म्हणजे हे पुस्तक त्यांनी बाल साहित्य म्हणून लिहिलं नव्हतंच. ठरवून लिहिणं हा त्याचा पिंडही नव्हता. मनात येईल ते आणि तेव्हाच लिहिणे हा त्यांचा स्वभाव. कुणी एखादा विषय सांगावा आणि त्यांच्याकडून लिहून घ्यावं असं सहसा होत नसे. त्यांची पत्रकारिता ही त्यांच्या अटींवर होती. एखादा लेख लिहिण्यासाठी शेकडो मैलांचा थकवणारा प्रवासही ते करून जात. वयाच्या साठी पर्यंत जवळपास हा सिलसिला सुरू होता. प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन माणसांना भेटून त्या आपला रिपोर्ताज तयार करत. यातूनच पूर्णिया, वेध, छेद,संभ्रम, कोंडमारा, धागे आडवे उभे, धार्मिक माणसं, वाघ्या-मुरळी, प्रश्न आणि प्रश्न अशी त्यांची पुस्तकं आली. मी कल्पनेने लिहिणारा लेखक नाही, मी नेहमी वास्तव मांडत जातो. समाजातील वेगवेगळ्या घटकांशी बोलून त्यावर विचार करून त्यांचे प्रश्न गांभीर्याने जगासमोर आणण्याचे काम करतो असं ते म्हणत. हमालांचे प्रश्न विडी कामगारांचे प्रश्न, मेहतर समाज आदींच्या समस्या त्यांनी आपल्या लिखाणातून मुखर केल्या. मच्छीमार आणि समुद्र, खाण कामगारांचे प्रश्न यावरही ते वेळोवेळी लिहीत राहिले. आजुबाजूचा भयाण वास्तव मांडणं हा त्यांचा ध्यास होता. हे करत असतानाच ते स्वतःकडे ही वेगळ्या दृष्टीने पाहू शकले. त्यातूनच स्वतःविषयी, आप्त, मोर ही पुस्तकं आलीत. मग ते कविता लिहू लागले. आपण कधीही कथा लिहू शकू कल्पनेने काल्पनिक पात्र निर्माण करू शकू असे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. मात्र मुलांची खेळताना बागडताना ते हळूच त्यांचे भावविश्‍व काबीज करत.

बासरी वाजवणे, गायन, कागदांचे विविध आकार साकारत ओरिगामी करणे, मुलांना जादू करून दाखवणे, चित्र रेखाटणे, काष्ठ शिल्प बनवणे हे त्यांचे आवडीचे छंद. मुलांमध्ये मूल होऊन ते रमून जात. त्यांच्या सोबत फिरायला जात. त्यांच्या बाळबोध प्रश्नांना उत्तर देत त्यांचं मनोरंजन करीत. यातूनच मग त्यांची मुलांसाठी पुस्तके जन्माला आली. *सृष्टीत...गोष्टीत* *जनात वनात* ही त्यांनी मुलांसाठी लिहिलेली  पुस्तकं. सृष्टीत गोष्टीत या पहिल्याच पुस्तकानं बालसाहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार पटकावला. परंतु पुस्तकांना पुरस्कार मिळवणे हेच त्यांच्या लिखाणाचा आहे अंतिम ध्येय कधीच नव्हतं. 

जुन्या पिढीतील कमल देसाई यांच्यापासून प्रेरणा घेऊन ते मुलांसाठी कथा लिहू लागले. कमल देसाईंच्या कथेत फॅन्टसीचा वापर असे. त्या निर्जीव वस्तूंशी बोलत. ते टेकडीवरच्या जंगलात फिरायला जात. सोबत मुलांना घेऊन जात. मग ती जंगलातली झाडं, तिथले प्राणी यांच्या बद्दल ही त्यांच्या मनात एक आपुलकी तयार झाली. झाडांच्या बुंध्याशी बसून ते झाडांशी गप्पा करू लागले. हम ती झाडेही आपल्याशी बोलत आहेत. काय दाढीवाले कसं काय? असं एखादं झाड त्याच्या बुंध्यातून आपल्याशी बोलतोय असं त्यांना वाटू लागलं. ते मत या झाडांची निसर्ग सृष्टीशी रमून जात. झाडांना माणसं बद्दल काय वाटत असेल? माणसं इतकं घसा ताणून बोलतात त्याचा झाडांना त्रास होत नसेल का? मोर ससे यांना काय वाटत असेल? मग फिरून परत येताना एखादी गोष्ट त्यांच्या हाताशी आलेली असे. याच गोष्टी सृष्टीत... गोष्टीत या पुस्तकात आल्या आहेत. अगदी मुंगी डान्स अशा कीटकांची त्यांच्या गप्पा होत. त्याच्याच पुढे गोष्टी झाल्या. त्यांनी कीटक शास्त्राचा ही अभ्यास केला होता. एखादी मुंगी चालली असेल तर ती कुठे जात असेल? ती रस्ता चुकली असेल का? मुंग्या रांगेने कशा चालतात? एकमेकींच्या डोक्याला डोकं लावून कशा पुढे जातात? रांग सोडून एखादी मुलगी एकटीच कुठे निघाली असेल? असे प्रश्न त्यांना पडत. एवढंच नाही घरातील पंखा चपला कंप्युटर त्याचा माऊस या निर्जीव गोष्टींशीही ते बोलत. त्यातून या गोष्टी आकाराला आल्या त्या लिहिताना त्यांना खूप आनंद मिळे. त्यांच्यातील अवखळ मुल जागं होई.

आजुबाजूच्या जगाकडे डोळसपणे पाहण्याची जाणीव मात्र अनिल अवचट यांच्या कथांनी दिली. लहान मुलांनाही एक वेगळा दृष्टिकोन दिला. मात्र ते ठरवून केलं नाही. त्यांच्या लेखन शैलीतील व कृत्रिमता हीच खरं तर त्यांच्या लेखनाची ताकद आहे. सहज उगवतं गप्पा मारत बोलण्यासारखं ते लिहितात. हा गोष्टीवेल्हाळ पणा सर्वांनाच भावतो. मुलांसाठी केलेलं लेखन मोठ्या नाही तितकंच गुंतवून ठेवतं. 

मनातून उसळी मारून आल्याशिवाय मी काहीही लिहीत नाही ही त्यांची भावना होती. एखाद्या गोष्टीची सुरुवात सुचते, तिच्यावर मंथन होतं. हळूहळू पात्र आकार घेऊ लागतात. आणि ध्यानीमनी नसलेला शेवट त्या कथेला प्राप्त होतो. अनेकदा अनपेक्षित. या कथा जमून जातात वाचकांना आवडतात. हेच आपल्या लिखाणाचे यश आहे असं त्यांना वाटायचं. आपल्या कथेतून ते विज्ञानही मांडायचे. विज्ञानाचे सिद्धांत सोपे करून सांगायचे. माणसातल्या संवेदना सतत जाग्या राहिल्या पाहिजेत. पाचला मायेचा झरा वाटता कामा नये यासाठी ते अविरत लिहित राहिले. त्यांचं संवेदनशील मन त्यांच्या पुस्तकांच्या पानापानातून उतरलं आहे. माणसाचं नैराश्य दूर करणारी ताजी टवटवीत पुस्तकं त्यांनी वाचकांच्या हाती दिली. आपण खूप मोठे लेखक सामाजिक कार्यकर्ते आहोत. मुक्तांगणचे संस्थापक आहोत हे सर्व ते मुलांची खेळताना विसरून जात. आयुष्यभर आपल्या काळजात अवखळ मुल जपणारा हा साहित्यिक कलावंत. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यसृष्टी अक्षरशा पोरकी झाली आहे. मुलांच्या लाडक्या बाबाला शत शत प्रणाम!

संदर्भ[संपादन]