सुरेंद्र पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुरेंद्र रावसाहेब पाटील
जन्म नाव सुरेंद्र रावसाहेब पाटील
जन्म डिसेंबर २१, इ.स. १९६३
लामजना, ता. औसा लातूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र शिक्षक
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रण
विषय सामाजिक, ग्रामीण
प्रसिद्ध साहित्यकृती आंतरभेगा
चिखलवाटा
झुलीच्या खाली
पत्नी ओमदेवी
अपत्ये शुभदा , वृषभ , धनश्री
पुरस्कार
 • सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
 • सावित्रीबाई जोशी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद
 • भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार, कोपरगाव

सुरेंद्र रावसाहेब पाटील (२१ डिसेंबर, १९६३ - लामजना, औसा तालुका, लातूर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे मराठी कादंबरीकार आहेत. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी ए.टी.डी., जी.डी.आर्ट (पेंटिंग), ए.एम.-लातूर, मुंबई - सांगली येथे कलाशिक्षण घेतले आहे.

१९९३च्या भूकंपाचा लामजना गावाला बसलेल्या मोठ्या फटक्याचे पडसाद पाटील यांच्या आरंभीच्या कथासाहित्यातुन दिसतात.

पाटील हे १९९० पासून मा.दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी येथे 'रेखाकला व रंगकाम' विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

यांनी रेखाटनकार, चित्रकार आणि लेखक म्हणुन स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. १९८८ मध्ये सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयात 'कोरडी पॅलेट' या एकांकीकेपासून लेखनाची सुरुवात. १९९३ च्या विनाशकारी भूकंपाचा परिणाम लेखनावर झाला. महाविद्यालयात कवी फ.म. शहाजिंदे यांच्या सान्निध्यात लेखनाची आवड गंभीरतेत बदलली. १९९३ चा भूकंप, नापिकी, सततचा दुष्काळ हे लेखनातुन मांडले. राजन गवस, भास्कर चंदनशीव यासारख्या लेखकांचे साहित्य तसेच निवडक प्रादेशिक साहित्य वाचनाने लेखन बदलत गेले. गावमातीतला उघडा माणूस साहित्यात मांडला. लामजना व औराद शहाजानी परिसरातील बोली, शेतकरी जीवन, सुशिक्षित तरुणाचे भंगलेपण मांडायचा प्रयत्न पाटील यांच्या लेखणीने केला. अक्षरलिपी, वाघूर, मुराळी, सामना, प्रतिभा, सकाळ,पुण्यनगरी आदी अनेक दिवाळी अंकातून कथा, व्यक्तिचित्रे प्रकाशित.

प्रकाशित साहित्य[संपादन]

कथासंग्रह[संपादन]

 • आंतरभेगा- भावलावण्य प्रकाशन, औराद शहाजानी. २००१

कादंबरी[संपादन]

 • चिखलवाटा- साकेत प्रकाशन, औरंगाबाद. २००८
 • झुलीच्या खाली- मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई. २०१६

पुरस्कार[संपादन]

 • सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
 • सावित्रीबाई जोशी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद
 • भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार, कोपरगाव

इतर[संपादन]

 • आंतरभेगातील'बे एके बे' कथेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद बी.ए./बी.कॉम./बी. एस्सी. प्रथम वर्ष (मराठी द्वितीय भाषा) अभ्यासक्रमात समावेश -२००९
 • गुलबर्गा विद्यापीठ, गुलबर्गा,(बी. कॉम. द्वितीय वर्ष) 'चिखलवाटा या कादंबरीचा'अभ्यासक्रमात समावेश.-२००९
 • झुलीच्या खाली कादंबरीची लक्षवेधी कादंबरी म्हणून ललित कडून दखल -२०१६
 • ललित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, प्रतिष्ठान, मुराळी या अंकातुन लेखन.
 • प्रतिष्ठान या नियतकालिकातुन चित्रकारांचा परिचय करुन देत आहेत.
 • राजन गवस संपादित 'मुराळी' २०१९ या दिवाळी अंकासाठी रेखाटने.
 • महाराष्ट्र टाईम्स, ललित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, सक्षम समीक्षा,भाव-अनुबंध, प्रतिष्ठान इ.अनेक साहित्य पत्रिकेमधू अनेक समीक्षकानी कादंबरी लेखनाची स्वतंत्र दखल घेतली आहे.
 • यांच्या साहित्यावर (कादंबरी) अनेकांनी एम. फिल., पीएच डी.,चे संशोधन पुर्ण केले आहे.
 • यांच्या निवडक कथांचा हिंदीमध्ये अनुवाद झाला आहे.

आगामी[संपादन]

 • गावमातीच्या गोष्टी (व्यक्तिचित्रण)
 • संशयाष्टक (कादंबरी)