Jump to content

सुनेत्रा पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुनेत्रा पवार
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावSunetra संपादन
आडनावपवार संपादन
जन्म तारीख१८ ऑक्टोबर 1963 संपादन
वैवाहिक जोडीदारअजित पवार संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी संपादन

सुनेत्रा अजित पवार (१८ ऑक्टोबर, १९६३:धाराशिव - ) या महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत. त्या ३१ जानेवारी, २०२६ पासून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. या पदावर विराजमान झालेल्या त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला आहेत.[१] यापूर्वी, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या म्हणून महाराष्ट्रातून राज्यसभेच्या खासदार होत्या. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या पत्नी आहेत.

सुनेत्रा पवार बारामती टेक्सटाईल कंपनीच्या चेअरपर्सन आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या मुख्याधिकारी आहेत. त्यांना जय आणि पार्थ पवार ही २ मुलगे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार होत्या.[२][३][४] महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री,ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री आणि धाराशिव मतदारसंघाचे लोकसभा खासदार म्हणून ज्यांनी काम केले असे डॉ.पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे थोरले भाऊ आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ ""मी सुनेत्रा अजित पवार...", महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री". लोकमत. 31 January 2026. 31 January 2026 रोजी पाहिले.
  2. ↑ "Sunetra Pawar eyes ministerial berth in Modi govt as she is set to be Rajya Sabha MP". द इंडियन एक्सप्रेस. 15 June 2024. 28 June 2024 रोजी पाहिले.
  3. ↑ द हिंदू Bureau (18 June 2024). "Ajit Pawar's wife Sunetra elected Rajya Sabha member". द हिंदू. 28 June 2024 रोजी पाहिले.
  4. ↑ Nair, Ardhra (11 June 2024). "City NCP unit seeks RS seat, MoS post for Sunetra Pawar". The Times of India. 28 June 2024 रोजी पाहिले.