पद्मसिंह बाजीराव पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पद्मसिंह बाजीराव पाटील
पद्मसिंह बाजीराव पाटील

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९व(इ.स.2014)
मागील कल्पना नरहिरे
मतदारसंघ उस्मानाबाद

जन्म १ जून १९४०
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
धर्म हिंदू

डॉ. पद्मसिंह बाजीराव पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आहेत.

बालपण[संपादन]

शिक्षण[संपादन]

खासदार[संपादन]

ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातेवाईक आहेत.[१] पद्मसिंह पाटील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. पवनराजे निंबाळकर खूनप्रकरणी सीबीआयने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने यांना पक्षातून निलंबित केले.[२]

खुनाचे आरोप[संपादन]

कॉंग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांची मुंबईत कळंबोलीजवळ ३ जून २००६ रोजी हत्या करण्यात आली होती.[३] या हत्येसाठी दिली या गुन्ह्यात ते आरोपी आहेत. हत्येच्या कटाचे ते प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप पद्मसिंह पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. निंबाळकर यांच्या हत्येसाठी सुपारी देणे आणि कटाची आखणी असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. केंदीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलच्या कोर्टात पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.[४] ६ जून २००९ रोजी सीबीआयने यांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ आणि १२० ब नुसार खून-खूनाचा कट रचल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीबीआयने यांच्या कुलाबा येथील घरावर टाकलेल्या छाप्यात पिस्तुल, रिव्हॉल्वर, नऊ रायफली, काडतुसे, ५२ तलवारी आणि ५२ लाख रुपये रोख सापडले.[५] पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येत यांचा हात असतानाही तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांना 'क्लीन चिट' दिली होती.[६]

जामिनावर सुटका[संपादन]

त्यांची २५ सप्टेंबर २००९ रोजी २ लाख रुपयांच्या जामिनावर सुटका झालेली आहे.[७]

अलिबाग सेशन्स कोर्टात खटला[संपादन]

पद्मसिंह पाटील यांच्या विरोधातील खटला अलिबाग सेशन्स कोर्टात सन २०११ च्या जून महिन्यात प्रारंभ होत असल्याचे संकेत सीबीआयने दिले आहेत.[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ डॉ. पद्मसिंहांविरुध्द दुहेरी खूनाचा गुन्हा दाखल Maharashtra Times
  2. ^ राष्ट्रवादीतून पद्मसिंह यांची उचलबांगडी
  3. ^ पवनराजे हत्या प्रकरणाचा उलगडा : दोन मारेकर्‍यांना 30 लाखांची सुपारी
  4. ^ निंबाळकर हत्याः पद्मसिंह मुख्य आरोपी
  5. ^ पद्मसिंहांकडे नऊ रायफली, ५२ तलवारी!
  6. ^ टार्गेट पद्मसिंह पाटील! म. टा.
  7. ^ Padamsinh Patil is granted bail
  8. ^ पद्मसिंहांविरोधात जूनमध्ये खटला