सीमांतपूजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वधूगृही जातांना वराने वधूच्या गावाची सीमा ओलांडल्यानंतर सीमांतपूजन करण्याची पूर्वीच्या काळी प्रथा होती. आजकाल विवाहदिनी देवळात सीमांतपूजन करण्याची प्रथा आहे. वधूचे आई-वडील व नातलग वरपक्षाचे स्वागत करण्यास्तव देवळात असलेल्या वराकडे जातात. गणपती आणि वरुण देवतांचे प्रतीक असलेली सुपारीकलश यांची पूजा करतात. विष्णूस्वरुप नवरदेवास आपली लक्ष्मीसारखी कन्या द्यावयची असल्यामुळे आई-वडील वराची पूजा करतात आणि त्यास नवीन पोषाख अर्पण करतात. वधूची आई वरमातेचे पाय धुते, आणि वरमाता तसेच वराकडील इतर आप्तेष्ट महिलांचा यथास्थित ओटीभरण विधी करते.