सीमांतपूजन
Appearance
वधूगृही जातांना वराने वधूच्या गावाची सीमा ओलांडल्यानंतर सीमांतपूजन करण्याची पूर्वीच्या काळी प्रथा होती. आजकाल विवाहदिनी देवळात सीमांतपूजन करण्याची प्रथा आहे. वधूचे आई-वडील व नातलग वरपक्षाचे स्वागत करण्यास्तव देवळात असलेल्या वराकडे जातात. गणपती आणि वरुण देवतांचे प्रतीक असलेली सुपारी व कलश यांची पूजा करतात. विष्णूस्वरूप नवरदेवास आपली लक्ष्मीसारखी कन्या द्यावयची असल्यामुळे आई-वडील वराची पूजा करतात आणि त्यास नवीन पोषाख अर्पण करतात. वधूची आई वरमातेचे पाय धुते, आणि वरमाता तसेच वराकडील इतर आप्तेष्ट महिलांचा यथास्थित ओटीभरण विधी करते.