अनुराधा गोरे
अनुराधा विष्णू गोरे (इ.स. १९५०? - हयात) या एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी मराठीत आठाहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. या मुंबईत पार्ले टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा मुलगा कॅप्टन विनायक विष्णू गोरे हा २६ सप्टेंबर, इ.स. १९९५ रोजी वयाच्या २६व्या वर्षी भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात मृत्यू पावला.
मुलाच्या मृत्यूनंतर अनुराधा गोरे यांनी शाळांशाळातून आणि मंडळांमंडळातून व्याख्याने देऊन तरुणांना भारतीय सैन्याची, सैनिकांची आणि ते करीत असलेल्या कामाची माहिती देणारी व्याख्याने देणे आणि वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिणे सुरू केले.
गोरे यांची बहुतेक पुस्तके सैन्य आणि सैनिक यासंबंधी आहेत. त्या जानेवारी २०१७ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
त्या मूळच्या साताऱ्याच्या आहेत.
निवडक पुस्तके
[संपादन]- आचंद्र-सूर्य नांदो (कथासंग्रह)
- ओळख सियाचीनची (माहितीपर)
- कथासागर (भाग १, २) - कथासंग्रह
- कळी उमलताना (मार्गदर्शनपर)
- गाऊ त्यांना आरती (युद्धविषयक)
- जॅक ऑफ ऑल (बालसाहित्य)
- परीक्षेची भीती कशाला?
- वारस होऊ अभिमन्यूचे (२००९) : या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर झाले आहे.
- शौर्य
- शौर्य कथा (युद्धविषयक) (भाग १, २)