सिग्मुंड फ्रॉइड

सिग्मुंड फ्रॉइड (मराठी लेखनभेद: जिग्मुंड फ्रॉइड, सिग्मंड फ्रॉइड ; जर्मन: Sigmund Freud ;) (मे ६, इ.स. १८५६ - सप्टेंबर २३, इ.स. १९३९) हा ऑस्ट्रियन मज्जाशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ होता. याने विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केले.
वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते, ती मानवातही असणार आहे. त्यासाठी लैंगिक आकर्षण नैसर्गिकरीत्या प्रत्येक व्यक्तीत असायला असणार. असे लैंगिक आकर्षणाचे काही कारणाने प्रकटीकरण होऊ शकले नाही तर त्याचा मानवी व्यक्तीच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो. असा विचार त्याने मांडला.
प्रमुख विचार/संशोधन[संपादन]
- मानवी वर्तणुकीवर मेंदूतील सुप्त भावनांचा प्रभाव याचा अभ्यास केला.
- मेंदू आणि भावना यांचा परस्परसंबंध जोडला.
- मानवी वर्तनाची मिमांसा यावर विपुल लेखन केले.
- वैद्यकशास्त्रात व मानसशास्त्र अभ्यासक्रमात लेखन आजही जगभर अभ्यासले जाते.
बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- कोटीडायना.ऑर्ग - सिग्मुंड फ्रॉइडाचे निबंध (इंग्लिश मजकूर)
- फ्रॉइड संग्रहालय, मेअर्सफील्ड गार्डन्स, लंडन (इंग्लिश मजकूर)